सई ताम्हणकर-समीर चौगुलेची हटके केमिस्ट्री, 'गुलकंद'मधील 'चल जाऊ डेट'वर गाण्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 10:52 IST2025-03-28T10:49:25+5:302025-03-28T10:52:13+5:30

'गुलकंद' सिनेमातील 'चल जाऊ डेटवर' हे नवीन गाणं रिलीज झालंय (sai tamhankar, prasad oak)

gulkand movie new song chal jau datevar starring samir choughule sai tamhankar prasad oak | सई ताम्हणकर-समीर चौगुलेची हटके केमिस्ट्री, 'गुलकंद'मधील 'चल जाऊ डेट'वर गाण्याची चर्चा

सई ताम्हणकर-समीर चौगुलेची हटके केमिस्ट्री, 'गुलकंद'मधील 'चल जाऊ डेट'वर गाण्याची चर्चा

सध्या मराठी मनोरंजन विश्वात 'गुलकंद'सिनेमाची चर्चा आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राचे लेखक-दिग्दर्शक सचिन मोटे-सचिन गोस्वामी या जोडीने हा सिनेमा बनवला आहे. काहीच दिवसांपूर्वी 'गुलकंद' (gulkand) सिनेमातील 'चंचल' हे गोड प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या पहिल्या गाण्यानंतर चित्रपटातील दुसरं गाणं 'चल जाऊ डेटवर' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

गंमतीदार अंदाजातील या गाण्याचे बोल, संगीत प्रेक्षकांना नक्कीच भावेल. हे गाणं ऐकायला जितकं छान आहे, तितकंच त्याचं सादरीकरणही अप्रतिम आहे. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपूवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजीत यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे. 

 'गुलकंद' सिनेमातील दुसरं गाणं

'चल जाऊ डेटवर' या गाण्यात सई आणि समीरची भन्नाट केमिस्ट्री दिसत असून समीर आणि सईचे नृत्य एक सरप्राईज आहे. सई समीरची ही ढवळे फॅमिली कुठे आणि कशी डेटवर जाणार आणि तिथे काय धमाल होणार,  याचा उलगडा 'गुलकंद' प्रदर्शित झाल्यावर होणार आहे. तोवर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचेल हे नक्की!

दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, "या गाण्यातील  सई, समीर आणि प्रसाद, ईशा यांची केमिस्ट्री मजेशीर असून प्रेक्षकांना हसवणारी आहे. गाण्याचे बोल, संगीत सगळंच खूप छान आहे. एक वेगळाच मूड बनवणारं हे गाणं असल्यानं त्याचं चित्रीकरण तसंच होणं गरजेचं होतं. मस्त कलरफुल ठिकाणी चित्रित करण्यात आलेलं हे गाणं संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल. गाण्यात सई -समीर जरी डेटवर जात असल्याचे दिसत असले तरी १ मे रोजी सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह ही डेट एन्जॉय करावी.’’ 



या दिवशी प्रदर्शित होणार 'गुलकंद' सिनेमा

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे तगडे कलाकार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा १ मे २०२५ ला महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

Web Title: gulkand movie new song chal jau datevar starring samir choughule sai tamhankar prasad oak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.