जिनिलियाची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेशसाठी खास पोस्ट, जाहीर कबुली देत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:11 IST2025-02-03T14:11:18+5:302025-02-03T14:11:40+5:30

जिनिलियाने रितेशसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केलेत. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले...

genelia deshmukh s special post for riteish on their wedding anniversary made a confession | जिनिलियाची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेशसाठी खास पोस्ट, जाहीर कबुली देत म्हणाली...

जिनिलियाची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेशसाठी खास पोस्ट, जाहीर कबुली देत म्हणाली...

महाराष्ट्राचं लाडकं कपल रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या लग्नाला १३ वर्ष पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेचे लाडके दादा वहिनी आज लग्नाचा वाढदिवस साजका करत आहेत. त्यांची लव्हस्टोरी तर सगळ्यांना माहितच आहे. जिनिलियाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नवरोबासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे तिने या पोस्टमधून एक गोष्ट आज मान्य केली आहे. ती काय आहे वाचा.

जिनिलियाने रितेशसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केलेत. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "कबुली: इतर वेळी मी सगळं प्लॅन करत असते पण याला एक अपवाद आहे ते म्हणजे तू (रितेश). हे मी कधीच प्लॅन केलं नव्हतं.
नवीन प्रेम चमकतं 
खरं प्रेम फायर असतं
पण आपलं प्रेम माझ्या सर्वात आवडीचं आहे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पार्टनर इन क्राइम, माझं कायमचं घर आणि माझ्या चेहऱ्यावर हास्य हसतं, मी आनंदी असते आणि मला जीवंत असल्याची जाणीव होते ते फक्त तुझ्यामुळेच. १३ वर्ष आणि हा प्रवास सुरुच आहे."


रितेश आणि जिनिलिया ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांना दोन मुलंही आहेत. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे, दोन वर्षांपूर्वीच ते 'वेड' या मराठी सिनेमात एकत्र दिसले. त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे.

Web Title: genelia deshmukh s special post for riteish on their wedding anniversary made a confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.