मी नशीबवान! आदिनाथ कोठारेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, बाप्पाच्या भक्तीत झाला दंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 18:07 IST2025-08-29T18:07:24+5:302025-08-29T18:07:43+5:30

अभिनेता निर्माता दिग्दर्शक आदिनाथ कोठारे याने नुकतंच लालबागच्या राजाच दर्शन घेतलं. आदिनाथने सोशल मीडिया वर एक खास व्हिडिओ शेयर करून लालबागच्या राजाच्या दरबारातली खास झलक प्रेक्षकांना दिली आहे. 

ganeshotsav 2025 adinath kothare took blessings of lalbaugcha raja and mumbaicha raja | मी नशीबवान! आदिनाथ कोठारेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, बाप्पाच्या भक्तीत झाला दंग

मी नशीबवान! आदिनाथ कोठारेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, बाप्पाच्या भक्तीत झाला दंग

गणरायाचं आगमन झाल्यामुळे सर्वत्र मंगलमय आणि आनंदाचं वातावरण आहे. लाडक्या राजाच्या आगमनाने लालबागनगरी सजली आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी मुंबईतील लालबागमधील प्रसिद्ध गणेश मंडळांना भेटी देऊन बाप्पाचं दर्शन घेतात. यंदाही सेलिब्रिटी गणरायाच्या दर्शनासाठी लालबागनगरीत येत आहेत. अभिनेता निर्माता दिग्दर्शक आदिनाथ कोठारे याने नुकतंच लालबागच्या राजाच दर्शन घेतलं. आदिनाथने सोशल मीडिया वर एक खास व्हिडिओ शेयर करून लालबागच्या राजाच्या दरबारातली खास झलक प्रेक्षकांना दिली आहे. 

या व्हिडीओला त्याने "कालच्या नशीबवान दर्शनाची झलक" असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये आदिनाथ तल्लीन होऊन बाप्पाच्या दर्शनात दंग झालेला दिसतोय. लालबागचा राजासोबतच आदिनाथने मुंबईचा राजाचंही दर्शन घेतलं. कामाच्या दृष्टीने तो सध्या स्वतःला खूप 'नशीबवान' समजतो आहे. कारण लवकरच आदिनाथ नव्याकोऱ्या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. 'नशीबवान' मालिकेची निर्मिती करून स्वतःच्या मालिकेत अभिनेता म्हणून देखील तो काम करणार आहे म्हणून ही मालिका त्याचासाठी खास असल्याचं कळतंय. 


आदिनाथ बॉलिवूड मध्ये देखील बड्या प्रोजेक्ट्स मध्ये दिग्गज कलाकारांच्या सोबतीने काम करताना दिसणार आहे. गांधी, रामायण आणि अनेक उत्कंठावर्धक बॉलिवुड प्रोजेक्ट्स मध्ये तो काम करणार असून ही भावना त्याचासाठी " नशीबवान" आहे यात शंका नाही !

Web Title: ganeshotsav 2025 adinath kothare took blessings of lalbaugcha raja and mumbaicha raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.