सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची गोष्ट, 'फॉलोअर' सिनेमाचा टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:34 IST2025-02-27T16:33:59+5:302025-02-27T16:34:33+5:30

'फॉलोअर' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कहाणी  या चित्रपटातून उलगडणार आहे.

follower new marathi movie teaser released Harshad Nalawade in lead role | सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची गोष्ट, 'फॉलोअर' सिनेमाचा टीझर प्रदर्शित

सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची गोष्ट, 'फॉलोअर' सिनेमाचा टीझर प्रदर्शित

सध्या मराठी सिनेमांतून उत्तम कथा असलेले महत्त्वाचे विषय हाताळले जात आहेत. फॉलोएर हादेखील येऊ घातलेला असाच एक मराठी सिनेमा आहे. 'रॉटरडॅम' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवलेल्या 'फॉलोअर' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कहाणी  या चित्रपटातून उलगडणार असून, मराठी, कन्नडा आणि हिंदी या भाषांचे अनोखे मिश्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्राच्या सीमाभागात मराठी, कन्नडा भाषिक वाद आहेत. हा विषय अपवादानंच चित्रपटात हाताळला गेला आहे. चित्रपटाच्या टीझरमधून पत्रकार असलेल्या तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कथा हाताळण्यात आल्याचं दिसत आहे. या कथेला नातेसंबंध, राजकारण असे पदर असल्याचंही जाणवत आहे. चित्रपटाचा टीझर पहिल्या फ्रेमपासूनच गुंतवणारा आहे. चित्रपटातील कलाकार नव्या दमाचे असले, तरी रॉटरडॅमसारख्या प्रतिष्ठित महोत्सवात दाखवल्या गेलेल्या या चित्रपटातून एक अनोखी गोष्ट मांडण्यात आली आहे. त्यामुळेच या चित्रपटाचा टीझर कुतूहल वाढवणारा आहे. २१ मार्च रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

'फॉलोअर'ची निर्मिती ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स आणि कॉजॅलिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. विनय मिश्रा, प्रीती अली, प्रतीक मोइत्रो, अनुभव केआर, पल्लवी रोहतगी, मौलिक शर्मा, चारुलता मैत्र, हर्षद नलावडे  हे या चित्रपटाचे निर्माते असून राघवन भारद्वाज, चरण सुवर्णा आणि अभिषेक गौतम हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन हर्षद नलावडे यांचे असून रघु बसरीमारद, डोना मुन्शी आणि हर्षद नलावडे यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. साकेत ग्यानी यांनी छायाचित्रण, मौलिक शर्मा संकलक, सम्यक सिंग यांनी लिहिलेल्या गीतांना सम्यक सिंग आणि अभिज्ञान अरोरा यांचे संगीत लाभले असून ही गाणी सम्यक सिंग यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत. 

Web Title: follower new marathi movie teaser released Harshad Nalawade in lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.