१०व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची घोषणा; सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेता कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 18:58 IST2025-07-11T18:57:58+5:302025-07-11T18:58:38+5:30

१०व्या फिल्मफेअर मराठी पुरस्कारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर!

Filmfare Awards Marathi 2025 Full Winners List Paani And Phullwanti Movie Won Maximum Awards | १०व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची घोषणा; सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेता कोण?

१०व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची घोषणा; सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेता कोण?

Filmfare Awards Marathi 2025: मराठी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा 'फिल्मफेअर मराठी' पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेमा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यंदा या सोहळ्याला मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार देखील उपस्थित होते. 'फिल्मफेअर मराठी २०२५' या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन यावर्षी सिद्धार्थ चांदेकर व अमेय वाघ यांनी केलं.  हा १० वा पुरस्कार सोहळा काल १० जुलै २०२५ रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे पार पडला.  'फुलवंती' हा चित्रपट सात प्रमुख पुरस्कारांसह या सोहळ्यातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. त्याच्या पाठोपाठ 'पाणी' या चित्रपटाने सहा पुरस्कार पटकावले.

महेश मांजरेकर यांना 'जुनं फर्निचर' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) साठी पुरस्कार मिळाला. तर प्राजक्ता माळी (फुलवंती) आणि वैदेही परशुरामी (एक दोन तीन चार) यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) साठी पुरस्कार देण्यात आला. आदिनाथ कोठारेला 'पाणी'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर जितेंद्र जोशीला 'घात'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स चॉईस) पुरस्कार मिळाला. राजश्री देशपांडेला 'सत्यशोधक'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स चॉईस) म्हणून निवडण्यात आलं.


पुरस्कार सोहळ्याच्या या संध्याकाळी उत्कृष्ट संगीताला आदरांजली वाहताना संगीतातील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मान स्वीकारताना त्या म्हणाल्या, "हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेणाऱ्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते. तसेच आज पुरस्कार मिळालेल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन". त्यांना हा सन्मान प्रदान करणारे सचिन पिळगावकर यांनी गंमतीने विचारलं की, "त्यांनी आपली फक्त गायनाची प्रतिभाच का जगासमोर आणली आणि आपली दुसरी प्रतिभा 'चित्रकला' का लपवून ठेवली? यावर उषा मंगेशकर म्हणाल्या की, त्या पेंटिंग्ज फक्त त्यांच्यासाठीच होत्या आणि नंतर त्यांनी त्या पेंटिंग्जमधून स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी एक पुस्तकही तयार केलं होतं.  यावेळी डॉ. जब्बार पटेल यांनी प्रेक्षकांना सांगितलं, की उषाजी कधीकाळी निर्मात्याही होत्या.

'फिल्मफेअर मराठी २०२५' पुरस्कार सोहळ्यातील संपूर्ण विजेत्यांची यादी:

सर्वोत्कृष्ट चित्रपट - पाणी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदिनाथ एम. कोठारे (पाणी)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) - अमलताश (सुहास देसले), घात (छत्रपाल आनंद निनावे)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका - पुरुष) - महेश मांजरेकर (जुनं फर्निचर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)- जितेंद्र जोशी (घात)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका - स्त्री)- प्राजक्ता माळी (फुलवंती), वैदेही परशुरामी (एक दोन तीन चार)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)- राजश्री देशपांडे (सत्यशोधक)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष)- क्षितिश दाते (धर्मवीर २)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (स्त्री) -नम्रता संभेराव (नाच गं घुमा)
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम- अविनाश-विश्वजीत (फुलवंती)
सर्वोत्कृष्ट गीत- कै. शांता शेळके (सरले सारे - अमलताश)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) - राहुल देशपांडे (सरले सारे - अमलताश)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (स्त्री) - वैशाली माडे (मदनमंजिरी - फुलवंती)
सर्वोत्कृष्ट कथा- छत्रपाल आनंद निनावे (घात)
सर्वोत्कृष्ट पटकथा- नितीन दीक्षित (पाणी)
सर्वोत्कृष्ट संवाद- महेश मांजरेकर (जुनं फर्निचर)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- गुलराज सिंग (पाणी)
सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन- अनमोल भावे (पाणी)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण- महेश लिमये (फुलवंती)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- एकनाथ कदम (फुलवंती)
सर्वोत्कृष्ट ए़डिटिंग- मयूर हरदास आणि आदिनाथ एम. कोठारे (पाणी), नवनीता सेन (घात)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- मानसी अत्तार्डे (फुलवंती)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक- नवज्योत बांदिवडेकर (घरात गणपती), राहुल रामचंद्र पवार (खडमोड)
सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरूष - धैर्य घोलप (एक नंबर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्त्री- जुई भागवत (लाइक आणि सब्सक्राइब)
लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार- उषा मंगेशकर

 
मराठी सिनेमाचा हा शानदार सोहळा, अविस्मरणीय क्षण, मनोरंजक गप्पा आणि बरंच काही, ३ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून फक्त झी टॉकीजवर पाहायला विसरू नका!


 

Web Title: Filmfare Awards Marathi 2025 Full Winners List Paani And Phullwanti Movie Won Maximum Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.