वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांचा ​What’s up लग्न हा चित्रपट प्रदर्शित होणार १६ मार्चला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 10:20 AM2018-03-12T10:20:54+5:302018-03-12T15:50:54+5:30

रुपेरी पडद्यावरील लग्नांबाबत बोलायचे झाले तर इथली बरीच लग्नं अविस्मरणीय ठरली आहेत. रुपेरी पडद्यावरील अशाच एका लग्नाची चर्चा मागील ...

The film will be released on 16th March, according to Vaibhav Linguist and Prayer Behera | वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांचा ​What’s up लग्न हा चित्रपट प्रदर्शित होणार १६ मार्चला

वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांचा ​What’s up लग्न हा चित्रपट प्रदर्शित होणार १६ मार्चला

googlenewsNext
पेरी पडद्यावरील लग्नांबाबत बोलायचे झाले तर इथली बरीच लग्नं अविस्मरणीय ठरली आहेत. रुपेरी पडद्यावरील अशाच एका लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत सुरू आहे. हे अनोखे लग्न मोठ्या पडद्यावर कधी पाहायला मिळतेय याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली होती, पण आता ती संपली आहे. मराठी रसिकांचे लाडके कलाकार म्हणजेच वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘What’s up लग्न’ हा चित्रपट १६ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘फिनक्राफ्ट मीडिया’ अँड ‘एन्टरटेन्मेंट प्रा. लि’. या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे.
‘नटसम्राट’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने आपली दिग्दर्शकीय इनिंग सुरू केली आहे. जाई जोशी आणि व्हिडीओ पॅलेस यांची प्रस्तुती असणाऱ्या ‘What’s up लग्न’ या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शन, मार्केटिंग बाबत नानूभाई जयसिंघानी यांचे सुरुवातीपासून सहकार्य लाभले आहे. संगीतसुद्धा चित्रपटासाठी महत्त्वाचे असल्याने चित्रपट चित्रीकरणाच्या आधीपासून या गीतांचे नियोजन करण्यात आले.
‘कॉफी आणि बरंच काही’आणि मि. अँड मिस्टर सदाचारी या चित्रपटानंतर वैभव आणि प्रार्थना या हिट जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. या जोडीसोबत विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, स्नेहा रायकर, अश्विनी कुलकर्णी, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम विनी जगताप आदी मराठीतील नामवंत कलाकार या चित्रपटात आहेत. सोबत सुनील बर्वे, सविता मालपेकर आणि जयवंत वाडकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाची संकल्पना आणि लेखनसहाय्य विश्वास जोशी यांचे आहे. अभिराम भडकमकर आणि विश्वास जोशी यांनी मिळून ‘What’s up लग्न’ची कथा लिहिली असून पटकथा आणि संवादलेखन मिताली जोशी, अश्विनी शेंडे आणि विश्वास जोशी यांनी केले आहे. तेरे नाम, ओएमजी, वॅाण्टेड या हिंदी चित्रपटाचे  छायांकन करणारे सेतु श्रीराम या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपट करीत आहेत. संकलनाची जबाबदारी फैजल महाडीक आणि इम्रान महाडीक यांनी पार पाडली आहे. अश्विनी शेंडे आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निलेश मोहरीर, ट्रॅाय-आरीफ आणि यांनी संगीत दिले आहे. हृषिकेश रानडे, निहीरा जोशी-देशपांडे, केतकी माटेगावकर, श्रुती जोशी या गायकांनी What’s up लग्न मधील गाण्यांना सुमधूर सूर दिला आहे. या गाण्यांवर फुलवा खामकर, सुजीत कुमार आणि भक्ती नाईक यांनी कोरिओग्राफी केली आहे. आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे तर कला दिग्दर्शन शैलेश महाडीक यांनी केले आहे.
नातेसंबध, सध्याची जीवनशैली दाखवतानाच तंत्रज्ञानाने आपल्याला कवेत घेतले आहे की, आपण तंत्रज्ञानाला कवेत घेतले आहे यावर ‘What’s up लग्न’ मार्मिक पद्धतीने भाष्य करतो. धावपळीच्या युगात स्मार्ट सवांद साधत नातेसंबधाची वीण कशा पद्धतीने जपली जाते हे दाखवणारा ‘What’s up लग्न’ हा चित्रपट प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देऊन जाईल हे नक्की.

Also Read : ‘What’s up लग्न’ चित्रपटातील मनस्पर्शी गाणं रसिकांच्या भेटीला

Web Title: The film will be released on 16th March, according to Vaibhav Linguist and Prayer Behera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.