अभिनेत्री सायली संजीवच्या पायावरील टॅटू पाहून नाराज झाले चाहते, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 04:58 PM2021-09-02T16:58:58+5:302021-09-02T17:00:13+5:30

सायलीने नुकताच एक टॅटू आपल्या पायावर काढला आहे. तिचा टॅटू पाहून चाहते खूप नाराज झाले आहेत.

Fans were upset to see actress Sayali Sanjeev's tattoos on her legs, they said ... | अभिनेत्री सायली संजीवच्या पायावरील टॅटू पाहून नाराज झाले चाहते, म्हणाले...

अभिनेत्री सायली संजीवच्या पायावरील टॅटू पाहून नाराज झाले चाहते, म्हणाले...

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीवने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सायली संजीव सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. सायलीने नुकताच एक टॅटू आपल्या पायावर काढला आहे. तिचा टॅटू पाहून चाहते खूप नाराज झाले आहेत.  

सेलिब्रेटींमध्ये टॅटूचे क्रेझ बऱ्याचदा पहायला मिळते. मराठी सिनेइंडस्ट्रीतील बऱ्याच अभिनेत्रींनी टॅटू काढलेले पाहायला मिळाले आहेत. अजूनही बरसात आहे या मालिकेतील अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदेने देखील मानेच्या खालील बाजूला जिनचा जादुई चिराग हा सुंदर टॅटू काढून घेतला आहे. तिचा हा कलरफुल टॅटू तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.

शर्मिला राजाराम हिच्याप्रमाणे अभिनेत्री सायली संजीवने देखील नुकताच एक टॅटू आपल्या पायावर काढला आहे. तिने घुबडाचा टॅटू काढला आहे. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. ‘घुबड कशाला काढलस?’ घुबड अपशकून आहे’ मी जर घुबड टँटू म्हणून काढला तर अपशकुन म्हणून आई मला घराबाहेर काढेल. ‘ सायली तू महालक्ष्मीच्या वाहनाला पायावर ठेवलं’ अशा कित्येक प्रतिक्रिया देऊन तिच्या चाहत्यांनी सायलीला ट्रोल केले आहे.

तर अनेकांनी तिच्या या टॅटूचे कौतुक देखील केले आहे. घुबडाचे दर्शन भारतात अशुभ मानले जाते तर परदेशात त्याला शुभ मानले जाते. घुबड हा पक्षी दिसायला भयावह असला तरी तो अतिशय बुद्धिमान आहे आणि म्हणूनच लक्ष्मीने स्वतःचे वाहन म्हणून त्याची निवड केली आहे. 

Web Title: Fans were upset to see actress Sayali Sanjeev's tattoos on her legs, they said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.