'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 13:56 IST2025-05-23T13:54:16+5:302025-05-23T13:56:22+5:30

'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा

fandry movie shalu rajeshwari kharat new dance video viral in internet | 'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा

'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा

'फँड्री' सिनेमातून सर्वांच्या भेटीला आलेली शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरातची (rajeshwari kharat) सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. राजेश्वरी खरातला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. राजेश्वरीचं नाव घेतलं की सर्वांना 'फँड्री' सिनेमात तिने साकारलेल्या शालूची भूमिका आठवते. राजेश्वरी सध्या सोशल मीडियावर विविध डान्स व्हिडीओ शेअर करताना दिसते. 'एक नंबर, तुझी कंबर' या गाण्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर राजेश्वरीने इंग्रजी गाण्यावर खास डान्स केलाय. 

राजेश्वराची नवीन डान्स व्हिडीओ चर्चेत

राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर नवीन डान्स व्हिडीओ शेअर केलाय. या डान्स व्हिडीओत राजेश्वरी सुरुवातीला मॉडर्न लूकमध्ये दिसते. आरश्यासमोर फोन धरुन राजेश्वरी कॅमेरात तिच्या दिलखेचक अदा सर्वांना दाखवते. अशातच काही क्षणांनी राजेश्वरीचा लाल रंगाच्या साडीतला पारंपरिक लूक पाहायला मिळतो. राजेश्वरीच्या या डान्स व्हिडीओला चाहत्यांनी चांगलंच प्रेम दिलंय. राजेश्वरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अल्पावधीतच व्हायरल झालाय. राजेश्वरीच्या मॉडर्न लूकला चाहत्यांनी पसंती दिली आहे.


राजेश्वरीने स्वीकारला ख्रिश्चन धर्म

अभिनेत्री राजेश्वरी खरात काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला होता. ज्यात ती पाण्यामध्ये हात जोडून उभी असलेली दिसली. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, बाप्तिस्मा स्वीकारलं. याशिवाय तिने एक ग्रुप फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, 'परमेश्वर म्हणतो की, माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहेत, ज्या मला माहित आहे'. हॅशटॅगमध्ये तिने नवीन सुरूवात. बाप्तिस्मा स्वीकारल्याचे सांगितले आहे.  

अशाप्रकारे राजेश्वरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. राजेश्वरीच्या नवीन सिनेमाची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी राजेश्वरीने 'फँड्री'तील सहकलाकार सोमनाथ अवघडेसोबत एका सिनेमाच्या सेटवरील फोटो शेअर केले होते. त्यामुळे फँड्रीनंतर राजेश्वरी आणि सोमनाथ पुन्हा दिसण्याची शक्यता आहे.

Web Title: fandry movie shalu rajeshwari kharat new dance video viral in internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.