"त्यांच्याबरोबर काम करताना दडपण...", 'बिग बीं'सोबत काम करण्याचा अनुभव सांगताना 'जब्या' म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:41 IST2025-09-06T12:37:31+5:302025-09-06T12:41:16+5:30

"बच्चन सरांबरोबर काम केलं हे माझं भाग्य...", 'फॅण्ड्री' तील जब्याने सांगितल्या 'झुंड' सिनेमाच्या आठवणी 

fandry movie fame actor somnath awaghade talk in interview about working experience with amitabh bachchan in jhund says | "त्यांच्याबरोबर काम करताना दडपण...", 'बिग बीं'सोबत काम करण्याचा अनुभव सांगताना 'जब्या' म्हणाला...

"त्यांच्याबरोबर काम करताना दडपण...", 'बिग बीं'सोबत काम करण्याचा अनुभव सांगताना 'जब्या' म्हणाला...

Somnath Awaghade : बॉलिवूडचे महानायक म्हणजे अमिताभ बच्चन यांनी आजवर असंख्य चित्रपटांमधून काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांनी पडद्यावर साकारलेली प्रत्येक भूमिका गाजली. अमिताभ हे वयाच्या ८२ व्या वर्षीही ते सतत काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात. आजही ते इंडस्ट्रीत तितकेच सक्रिय आहेत.दरम्यान,एखादा लोकप्रिय नट असो किंवा नवोदित कलाकार  प्रत्येकाची त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते. अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबत काम केलं आहे. अशातच फॅंड्री फेम अभिनेता सोमनाथ अवघडेने बिग बींसोबत झुंड सिनेमात स्क्रिन शेअर करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

अलिकडेच सोमनाथ अवघडेने 'NB Podcast' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये झुंड सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच्या काही आठवणी देखील शेअर केल्या आहेत. या मुलाखतीमध्ये सोमनाथला तुला सर्वात कठीण आणि आव्हानात्मक अशी कोणती भूमिका वाटली? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना तो म्हणाला,"झुंड सिनेमातील भूमिका मला आव्हानात्मक वाटली. कारण, त्यात  हिंदी भाषा होती आणि मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायचं होतं. शिवाय ते वन टेकमध्ये सीन करतात असं मी ऐकून होतो, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना दडपण आलं होतं. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की माझ्या आयुष्यातील दुसऱ्या चित्रपटात बच्चन सरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अनेक कलाकारांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते पण मला ही संधी मिळाली."

त्यानंतर पुढे सोमनाथ म्हणाला,"या चित्रपटात बच्चन सरांचे आणि माझे बरेच एकत्र सीन्स होते. पण,तरीही मनात एक भीती होती की, ते वन-टेक देतात आणि आपल्याकडून काही चुका व्हायला नको ,असं वाटत होतं. पण, प्रत्यक्षात याच्या उलट घडलं. बच्चन सरांचा स्वभाव खूप छान आहे.त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. त्यावेळी प्रत्येक टेकनंतर मी त्यांना काम चांगलं झालं का असं विचारायचो.त्यावर,'अरे! खूपच छान काम करतोय तू...' असं ते म्हणायचे. आज टीव्हीवर जेव्हा झुंड सिनेमा आई-वडील पाहतात, तेव्हा आनंद वाटतो. 'झुंड' च्या सेटवर असताना आम्ही बच्चन सरांसोबत असायचो. तेव्हा ते आमच्यासोबत डान्स करायचे. गप्पा मारायचे. त्यांच्या कामाचे किस्से शेअर करायचे.
अशा सुंदर आठवणी सोमनाथने शेअर केला. 

Web Title: fandry movie fame actor somnath awaghade talk in interview about working experience with amitabh bachchan in jhund says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.