लग्नानंतर 'या' व्यक्तीने हृताला गिफ्ट केली अंगठी; अभिनेत्रीसाठी ही भेटवस्तू ठरतीये खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 18:47 IST2022-07-19T18:46:17+5:302022-07-19T18:47:44+5:30
Hruta durgule: या व्यक्तीने तिला अनन्या या नावाची खास अंगठी भेट देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे हे गिफ्ट पाहून हृता भारावून गेली आहे.

लग्नानंतर 'या' व्यक्तीने हृताला गिफ्ट केली अंगठी; अभिनेत्रीसाठी ही भेटवस्तू ठरतीये खास
रंगभूमी, मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (hruta durgule). 'अनन्या' चित्रपटाच्या माध्यमातून हृता लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा आहे. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या हृतासाठी अनन्या हा चित्रपट अनेक कारणांसाठी खास ठरत आहे.
हृताचा पहिला चित्रपट येणार असल्यामुळे तिच्यासोबतच तिचे चाहतेदेखील प्रचंड उत्सुक आहेत. म्हणूनच, एका चाहत्याने तिला एक सुंदर अंगठी गिफ्ट म्हणून दिली आहे.
हृताच्या आगामी चित्रपटासाठी एका चाहत्याने तिला अनन्या या नावाची खास अंगठी भेट देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. हे गिफ्ट पाहून हृता भारावून गेली आहे.
"चाहत्यांचं असं प्रेम बघून खरंच खूप भारावून जायला होते. आपल्यावर, आपल्या कामावर कोणी इतकं प्रेम करतं, ही भावनाच खूप आनंद देणारी आहे आणि याच प्रेमामुळे आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची ऊर्जा मिळते. 'अनन्या'मधून मी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. चित्रपट तर माझ्यासोबत आयुष्यभर असणारच आहे. मात्र 'अनन्या'ची ही अंगठीही माझ्यासोबत कायम असेल,'' असं हृता म्हणाली.
दरम्यान, येत्या २२ जुलै रोजी 'अनन्या' प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स यांनी केली आहे. तर चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे,