फुलवा खामकरच्या नवऱ्याला कधी पाहिलंय का? कलाविश्वापासून दूर 'या' क्षेत्रात कमावलंय नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 18:15 IST2024-01-03T18:14:31+5:302024-01-03T18:15:25+5:30
Phulwa khamkar: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त फुलवाने तिच्या नवऱ्यासोबतचा छानसा व्हिडीओ शेअर केला आहे.

फुलवा खामकरच्या नवऱ्याला कधी पाहिलंय का? कलाविश्वापासून दूर 'या' क्षेत्रात कमावलंय नाव
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकीच प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका म्हणजे फुलवा खामकर (phulwa khamkar). फुलवाने आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. इतकंच नाही तर काही डान्स रिअॅलिटी शोजसाठी तिने परिक्षकाची भूमिकाही बजावली आहे. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत येत असते. परंतु, यावेळी फुलवा कोणत्याही कोरिओग्राफीमुळे नाही तर तिच्या नवऱ्यामुळे चर्चेत आली आहे.
अलिकडेच फुलवाने तिच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त तिने तिच्या नवऱ्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या नवऱ्यासोबतचे काही मोजके फोटो कोलाज केले आहेत. विशेष म्हणजे या या व्हिडीओवरुन फुलवा आणि तिच्या नवऱ्याची उत्तम केमिस्ट्री असल्याचं दिसून येतं.
'माझ्याकडे तुमच्या कटू आठवणी आहेत कारण..'; वडिलांसाठी फुलवाची भावनिक पोस्ट
दरम्यान, फुलवाच्या नवऱ्याचं नाव अमर खामकर असं आहे. अमर आणि फुलवा यांचं लव्ह मॅरेज आहे. फुलवा आणि अमर दोघंही कॉलेजच्या हायकर क्लबचे सदस्य होते. यावेळी मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर. अमर खामकर हे व्यावसायिक आहेत. त्यांचा मसाल्यांचा व्यवसाय आहे. लालबागमध्ये त्यांच्या मसाल्याच्या दुकानांच्या शाखा असल्याचं सांगण्यात येतं.