कोकणच्या मातीतील कला! प्रेक्षकांमध्ये दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ची क्रेझ, ४ दिवसांतच बक्कळ कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 09:01 IST2025-09-16T08:59:27+5:302025-09-16T09:01:43+5:30
दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' बॉक्स ऑफिसवर सुस्साट! ४ दिवसांत केली 'इतक्या' कोटींची कमाई

कोकणच्या मातीतील कला! प्रेक्षकांमध्ये दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ची क्रेझ, ४ दिवसांतच बक्कळ कमाई
Dashavtar Box Office Collecttion Day 4: ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या दशावतार या सिनेमाची प्रदर्शानाच्या आधीपासूनच जोरदार चर्चा सुरु होती. अखेर हा बहु्प्रतीक्षित आणि बहुचर्चित १२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, प्रदर्शनानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दशावतारमध्ये दिलीप प्रभावळकरांनी साकारलेला बाबुली मेस्त्री प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. दरम्यान, हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. अवघ्या चार दिवसांत दशावतारने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. कोकणातील मातीची ऊब, आपलेपणा दाखवणारा हा चित्रपट पाहून सिनेप्रेमी भारावले आहेत.
सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सध्या या चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळते आहे, हे या चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीवरून दिसतंय. तीन दिवसांत दशावतारने ४.३७ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यात आता चित्रपटाच्या चौथ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी चित्रपटाने १.१६ कोटी इतकी कमाई केली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचं एकूण कलेक्शन ५.८५ कोटी इतकी झालं आहे.
दशावतारमधील कलाकार
'दशावतार' चित्रपटासह त्यातील सिनेमॅटोग्राफीचं देखील विशेष कौतुक करण्यात येत आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह जोडीला सुनील तावडे, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, भरत जाधव, रवी काळे, विजय केंकरे, आरती वाडगबाळकर या सगळ्यांनीच त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.