हटके स्टाइलमध्ये उभ्या असलेल्या या मराठी अभिनेत्याला ओळखलं का? रणवीर सिंगशी होतीये तुलना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 13:59 IST2023-05-07T13:58:37+5:302023-05-07T13:59:20+5:30
Marathi actor: या अभिनेत्याला मराठीतील रणवीर सिंग म्हटलं जात आहे.

हटके स्टाइलमध्ये उभ्या असलेल्या या मराठी अभिनेत्याला ओळखलं का? रणवीर सिंगशी होतीये तुलना
मराठी कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या हटके स्टाइलसाठी ओळखले जातात. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav). सहजसुंदर अभिनयशैली आणि स्वभावातील मनमोकळेपणा या मुळे सिद्धार्थ अल्पावधीत लोकप्रिय झाला. इतंकच नाही तर आज तो आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो हटके स्टाइलमध्ये दिसत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेला सिद्धार्थ त्यांच्या लूकच्या बाबतीत कायम नवनवीन प्रयोग करत असतो.असाच एक नवीन लूक त्याने केला असून त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी त्याची तुलना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत केली आहे. अनेकांनी तर त्याला मराठीतील रणवीर सिंग असं म्हटलं आहे.
दरम्यान, सिदार्थने हा फोटो एका समुद्र किनारी काढला असून त्याने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्याला मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.