कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर घेऊन येतायेत 'वऱ्हाडी वाजंत्री'मधून विनोदवीरांची फटावळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 12:50 PM2022-11-08T12:50:00+5:302022-11-08T12:52:14+5:30

एखादं क्षेत्र निवडताना प्रत्येक माणूस खूप विचार करून निर्णय घेतो. आणि जर मग ती गोष्टच पैशाशी निगडित असेल तर? ...

Captain Kalpesh Ravindra Magar is bringing comedians in 'varhadi vajantri' movie | कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर घेऊन येतायेत 'वऱ्हाडी वाजंत्री'मधून विनोदवीरांची फटावळ!

कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर घेऊन येतायेत 'वऱ्हाडी वाजंत्री'मधून विनोदवीरांची फटावळ!

googlenewsNext

एखादं क्षेत्र निवडताना प्रत्येक माणूस खूप विचार करून निर्णय घेतो. आणि जर मग ती गोष्टच पैशाशी निगडित असेल तर? तर नक्कीच दोन पावलं सावधतेने विचारपूर्वक निर्णय घेतला जातो. मात्र अशीच वेळ कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यावर आली आणि त्यांनी जराही वेळ न दौडवता आपले कलाप्रेम दाखविण्याची ही एक संधी समजून चित्रपट निर्मितीत उडी घेतली. हा व्यवसाय नेमका कसा केला जातो? यातील वाटा पळवाटा आपल्या कॅप्टन्सीद्वारे शोधत ‘वऱ्हाडी वाजंत्री’ सोबत घेऊन मराठी चित्रपट निर्मिती व्यवसायात दणक्यात एंट्री घेतली आहे. त्यांची पहिलीच निर्मिती असलेला प्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय पाटकर दिग्दर्शित ‘वऱ्हाडी वाजंत्री’ हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यांच्यासह या चित्रपटासाठी अतुल राजारामशेठ ओहळ हे सहनिर्माते आहेत. 


निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर सांगतात, अनेक देशांच्या तळाशी जहाजमार्गे प्रवास करीत असल्याने तेथील कला संस्कृती पाहून थक्क व्हायला होते. मात्र त्यासोबत आपल्या विविधरंगी संगीत - कला - साहित्य, संस्कृती, परंपरांविषयी अभिमान वाढतो. लहानपणापासून संगीतकलेची आवड असल्याने त्याचे रीतसर प्रशिक्षण घेतले आहे. अनेक मातब्बर कलावंतांचा सहवास लाभल्याने मी या क्षेत्राचा लहान असल्यापासून भाग आहे. आपले चित्रपट, संगीत पाहून ऐकून प्रसन्न वाटते., आपल्या कलावंतांकडे विलक्षण टॅलेंट आहे. विजय पाटकर, मकरंदजी, पॅडी, हेमांगी, रिमाताई, प्रियाताई, कदम, वाडकर, जोशीसर आणि इतर जेष्ठ श्रेष्ठ कलावंतांसोबत निर्माता म्हणून काम करण्याची संधी मी सोडूच शकत नव्हतो आणि म्हणून मी जराही विचार न करता निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. मी या क्षेत्रात निर्माता म्हणून येत असताना या क्षेत्राची इत्यंभूत माहिती घेऊनच पुढील पाऊले उचलत आहे. 

वैभव अर्जुन परब  लिखित “वऱ्हाडी वाजंत्री” या चित्रपटात त्यांनी दिग्गज कलावंतांची फौज उभी केली असून प्रमुख भूमिकेत विनोदाचा बादशहा मकरंद अनासपुरेंसोबत जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, रिमा लागू, पंढरीनाथ कांबळे, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, राजेश चिटणीस, प्रशांत तपस्वी, जयवंत भालेकर, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाच्या संगीताची लीलया समर्थपणे संगीतकार अविनाश विश्वजित, शशांक पोवार यांनी पेलेली असून गीतकार राजेश बामगुडे यांच्या गीतांवर स्वरसाज गायक आदर्श शिंदे, आनंदी जोशी, मैथिली पानसे-जोशी, स्व. नंदू भेंडे, डॉ. गणेश चंदनशिवे यांनी चढवला आहे. तर त्यावर नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव, राजेश बिडवे यांनी केले आहे.

Web Title: Captain Kalpesh Ravindra Magar is bringing comedians in 'varhadi vajantri' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.