आय लव्ह यू इन सीक्रेट! भूषण प्रधानची अनुषासाठी खास पोस्ट, दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:32 IST2025-01-10T16:31:44+5:302025-01-10T16:32:39+5:30

भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत.

bhushan pradhan wishes rumoured girlfriend anusha dandekar on her birthday says three taps | आय लव्ह यू इन सीक्रेट! भूषण प्रधानची अनुषासाठी खास पोस्ट, दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आय लव्ह यू इन सीक्रेट! भूषण प्रधानची अनुषासाठी खास पोस्ट, दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) सध्या अनुषा दांडेकरला (Anusha Dandekar) डेट करत आहे. दोघंही नुकतेच मालदीव ट्रीपलाही जाऊन आले. त्यांचे रोमँटिक, कोजी फोटो व्हायरल झाले होते. कालच अनुषा दांडेकरने ४३ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त भूषणच्या सोशल मिडिया पोस्टची सगळेच वाट पाहत होते. शेवटी रात्री भूषणने गर्लफ्रेंडसाठी खास पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या. तसंच त्याने दोघांच्यात नक्की कसा बाँड आहे हेही रील शेअर करत दाखवलं.

गेल्या वर्षी आलेल्या 'जुनं फर्निचर' या मराठी सिनेमात भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर ही फ्रेश जोडी दिसली. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. नंतर दोघं खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलं तेव्हा चाहतेही खूश झाले. काल अनुषाच्या वाढदिवसानिमित्त भूषणने पोस्ट करत लिहिले, "हॅपी बर्थडे नुश.. तू खूप प्रेरणादायी, कधीही न थांबणारी आणि सुंदर शक्ती आहेस. आज आपण फक्त तुझा वाढदिवस साजरा करत नाही आहोत तर तुझ्यासारख्या अतुलनीय व्यक्तीला साजरं करत आहोत. अशी व्यक्ती जी मोठ्या खुबीने आव्हानांचा सामना करते, न घाबरता पुढे जाते आणि सगळीडे प्रेम, प्रकाश पसरवते."

तो पुढे लिहितो, "हे रील सिद्ध करतं की ट्रेंडिंग चॅलेंजेसमध्ये कितीही वेळा अपयशी झालो तरी आपण त्या क्षणांमधूनही आनंद शोधतो. समोर येणाऱ्या प्रत्येक अडखळ्यातूनही आपण अविस्मरणीय वाट काढतो. three taps nush."


भूषणने शेवटी लिहिलेलं three taps म्हणजे काय माहितीये का? तर याचा अर्थ होतो I love you in secret. भूषणने या पोस्टमधून सीक्रेटमध्ये का होईन पण अनुष्कावरील प्रेमाची कबुली दिली आहे. तसंच त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी 'लवकर लग्न करा रे' अशा कमेंट्स केल्या आहेत.

Web Title: bhushan pradhan wishes rumoured girlfriend anusha dandekar on her birthday says three taps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.