अवधूत गुप्तेच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 16:15 IST2024-06-10T16:03:49+5:302024-06-10T16:15:12+5:30
अवधूत गुप्तेवर दु:खाचा डोंगर कोसळला

अवधूत गुप्तेच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
संगीतकार अवधूत गुप्तेवर (Avadhoot Gupte) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याची आई मृदगंधा गुप्ते यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. थोड्याच वेळात बोरिवली पूर्व येथील दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अवधूत गुप्ते अनेकदा मुलाखतींमध्ये आईविषयी व्यक्त झाला आहे. त्याचं आईवर जीवापाड प्रेम होतं जे वेळोवेळी दिसलं आहे. साधारण तीन वर्षांपूर्वीच मृदगंधा गुप्ते यांचं lung transplant ऑपरेशन करण्यात आलं. अवधूतनेच सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली होती. यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र आता अचानक आईच्या मृत्यूने अवधूत आणि कु़टुंबाला धक्काच बसला आहे. मृदगंधा या अवधूतसोबतच बोरिवली येथील घरी राहत होत्या.
मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार, संगीतकार, गायकांनी अवधूतची भेट घेत त्याचं सांत्वन केलं. त्याला धीर दिला. आईच्या जाण्याने त्याच्या आयुष्यात कायमची पोकळी निर्माण झाली आहे. आई हीच आपली पहिली मैत्रीण असं तो अनेकदा म्हणाला होता. तसंच अवधूतच्या करिअरमध्ये त्याच्या आईचाही मोठा वाटा होता.