Sanjeev Sanjeev : अशोक पप्पा व निवेदिता मम्माकडून सायली संजीवला मिळाली खास भेट, पाहा तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 15:33 IST2023-03-26T15:33:09+5:302023-03-26T15:33:39+5:30
Sanjeev Sanjeev : अशोक सराफांना सायली पप्पा म्हणते आणि निवेदिता यांना मम्मा म्हणते. दोघांनीही सायलीला मुलगी मानलंय. आपल्या या मम्मा पप्पाकडून सायलीला अलीकडे एक गोड भेट मिळाली...

Sanjeev Sanjeev : अशोक पप्पा व निवेदिता मम्माकडून सायली संजीवला मिळाली खास भेट, पाहा तर...
सायली संजीव (Sayali Sanjeev) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून तिचा अभिनय प्रवास सुरू झाला आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत सायलीने साकारलेली गौरीची भूमिका लोकांना इतकी आवडली की, ही गोड चेहऱ्याची अभिनेत्री सर्वांची आवडती अभिनेत्री बनली. अगदी अशोक सराफ ( Ashok Saraf) सुद्धा तिच्या गोड चेहऱ्याच्या आणि गोड स्वभावाच्या प्रेमात पडले. अशोक सराफांना सायली पप्पा म्हणते आणि निवेदिता यांना मम्मा म्हणते. दोघांनीही सायलीला मुलगी मानलंय. आपल्या या मम्मा पप्पाकडून सायलीला अलीकडे एक गोड भेट मिळाली.
‘झी चित्र गौरव पुरस्कार’च्या (Zee Chitra Gaurav Puraskar 2023) रेड कार्पेटवर खुद्द सायलीने या भेटीबद्दल सांगितलं. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सायली जांभळ्या रंगाची पैठणी नेसून आली होती. या पैठणीत सायली कमालीची सुंदर दिसत होती. ही पैठणी माझ्यासाठी खूपच खास आहे, कारण ती मला अशोक पप्पा व निवेदिता मम्मांनी भेट दिली आहे, असं सायलीने यावेळी सांगितलं.
पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडीओ सायलीने शेअर केला आहे. यात ती म्हणते, आणि या पैठणीची खासियत ही आहे की, अशोक पप्पा आणि निवेदिता मम्माने मला ही पैठणी स्पेशली विणून दिलेली आहे. त्यांनी माझ्यासाठी ही स्पेशली बनवून घेतलेली आहे, त्यामुळे ती माझ्यासाठी आणखी स्पेशल आहे. आतापर्यंत त्यांनी मला कधीही या साडीत पाहिलेलं नाही त्यामुळे मी आज खास ही साडी त्यांना दाखवायला नेसून आले आहे.
अनेकांना सायली संजीव ही अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलगी असल्याचं वाटतं. तशी ती अशोक सराफ व निवेदिता सराफ यांची मुलगी नाही. पण ती अशोक सराफांना पप्पा म्हणते. एका मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं होतं. मी अशोक सराफांना भेटेल किंवा मग त्यांना एकदिवस पप्पा म्हणू शकेल, अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. ते मला एकदा म्हणाले, काय म्हणशील तू मला? मी म्हटलं, काय म्हणू? यावर तू मला पप्पा म्हण. कारण तू बाबांना बाबा म्हणतेस, मला पप्पा म्हण...असं ते म्हणाले. या सगळ्यासाठी भाग्य लागतं. त्यांची भेट होणं, त्यांनी मला मुलगी माननं यासाठी नक्कीच भाग्य लागतं, असं सायली म्हणाली होती.