आई किंवा बहीणच दिसते, नवऱ्यासोबत का फिरत नाहीस? अमृता म्हणते; 'काही पॉइंट नाही...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 15:16 IST2024-05-17T15:15:12+5:302024-05-17T15:16:07+5:30
थेट कमेंट सेक्शनमध्येच अमृताने दिलं उत्तर

आई किंवा बहीणच दिसते, नवऱ्यासोबत का फिरत नाहीस? अमृता म्हणते; 'काही पॉइंट नाही...'
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या आईवडिलांसोबत लंडन ट्रीप एन्जॉय करत आहे. 'लुटेरे' ही वेबसीरिज गाजल्यानंतर अमृताने स्वत:साठी आणि कुटुंबासाठी वेळ काढला आणि ती आईवडिलांना घेऊन लंडनची भटकंती करत आहे. दरम्यान अमृता कधीच तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच हिमांशु मल्होत्रासोबत का दिसत नाही असा प्रश्न तिला अनेकदा विचारला जातो. एका चाहतीने कमेंट्समध्ये तिला यावर प्रश्न विचारला तेव्हा अमृतानेही चाहतीला उत्तर दिलं आहे.
अमृता खानविलकरने लंडन ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. यामध्ये ती पुरेपूर एन्जॉय करताना दिसत आहे. मात्र तिच्या एका पोस्टवर एका चाहतीने कमेंट करत विचारलं, 'तू कधीच हिमांशूसोबत का फिरत नाही? आम्ही तुम्हाला दोघांना क्वचितच एखाद्या ट्रीपला गेलेलं बघितलं असेल. कारण तुझ्यासोबत नेहमी आई किंवा बहीण असते.' चाहतीच्या या प्रश्नावर अमृता उत्तर देत लिहिते, 'हिमांशु इन्स्टाग्रामवर नाही. म्हणजे त्याचं अकाऊंट आहे पण तो फारसा पोस्ट करत नाही, कोणाला फॉलो करत नाही. त्यामुळे फोटो पोस्ट करण्यात काही पॉइंट नाही. आणि आम्हाला काही गोष्टी खासगी ठेवायलाच आवडतात.'
अमृताने उत्तर दिल्यानंतर चाहतीने तिला परत कमेंट करत सांगितलं की, 'कृपया एकत्र फोटो पोस्ट करा, नच बलियेपासून मला तुमची जोडी आवडते. तुम्ही शोचे विजेतेही होतात. सोबत फोटो पोस्ट करा मला तुमच्या जोडीची खूप आठवण येते.' चाहतीच्या या विनंतीवर अमृताने 'नक्कीच' असं म्हणत तिला आश्वासन दिलं आहे.