'छावा' सिनेमाची ऑफर मिळाल्यावर सखीची काय प्रतिक्रिया होती? सुव्रत जोशी म्हणाला -
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:45 IST2025-02-09T13:45:06+5:302025-02-09T13:45:53+5:30
'छावा'ची ऑफर मिळाल्यावर जेव्हा सुव्रतने घरी सांगितलं तेव्हा पत्नी सखी गोखलेची काय प्रतिक्रिया होती यावर अभिनेत्याने लोकमत फिल्मीशी संवाद साधला (chhaava)

'छावा' सिनेमाची ऑफर मिळाल्यावर सखीची काय प्रतिक्रिया होती? सुव्रत जोशी म्हणाला -
'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या सर्वांना उत्सुकता आहे. पुढील पाच दिवसांमध्ये 'छावा' सिनेमा जगभरात रिलीज होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा 'छावा' सिनेमातून पाहायला मिळणार आहे. विकी कौशलने (vicky kaushal) शंभूराजांची भूमिका साकारली आहे. 'छावा' सिनेमात अनेक मराठी कलाकार भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यापैकी एक कलाकार म्हणजे सुव्रत जोशी (suvrat joshi). सुव्रतने 'छावा'ची ऑफर स्वीकारल्यावर सखीची (sakhi gokhale) काय प्रतिक्रिया होती, यावर लोकमत फिल्मीशी संवाद साधलाय.
सखीची काय प्रतिक्रिया, सुव्रत म्हणाला-
'छावा' सिनेमाची ऑफर सुव्रतला मिळाली. सिनेमात सुव्रत नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार याविषयी अजून कोणतीही माहिती समोर आली नाहीये. सुव्रतने सुद्धा याविषयी खुलासा केला नाहीये. इतकंच नव्हे तर सुव्रतने त्याची पत्नी सखीलाही याविषयी काही सांगितलं नाहीये. सुव्रत म्हणाला की, "आमच्या घरात प्रोत्साहन प्रचंड आहे. कोणी काहीही केलं तरी आम्ही त्याला प्रचंड प्रोत्साहन देतो. फक्त यावेळेस मी जास्त काही सखीला सांगितलं नाही. मी दरवेळेस तिला सगळं सांगून टाकतो. पण यावेळेस जरा गुलदस्त्यात ठेवलंय."
"'ताली'मध्ये मी ट्रान्सपर्सनची भूमिका केली. सुश्मिता मॅम आणि रवी जाधव यांच्यासोबत काम केलं. त्या भूमिकेमुळे मला खूप कौतुक मिळालं. त्यावेळेस सखीला पूर्णपणे माझं वेगळं रुप बघायला मिळालं. त्यामुळे 'छावा'मध्येही काय वेगळं बघायला मिळणार हे तिला कळेल." अशाप्रकारे सुव्रतने खुलासा केलाय. सुव्रतसोबत 'छावा' सिनेमात संतोष जुवेकर, सारंग साठ्ये हे मराठी कलाकारही पाहायला मिळणार आहेत. १४ फेब्रुवारी २०२५ ला 'छावा' सिनेमा रिलीज होणार आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलंय.