"हुरहूर, दडपण, बाकी सगळं नशीबावर..." आदिनाथ कोठारेची पोस्ट चर्चेत, असं का म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 14:16 IST2025-09-16T14:11:16+5:302025-09-16T14:16:24+5:30
आदिनाथ कोठारेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

"हुरहूर, दडपण, बाकी सगळं नशीबावर..." आदिनाथ कोठारेची पोस्ट चर्चेत, असं का म्हणाला?
मराठी सिनेसृष्टीतील लाडका अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे (Adinath Kothare). वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आदिनाथ अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. हँडसम हंक आदिनाथ कोठारेची आज तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे. उत्तम अभिनय आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर त्याने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. आदिनाथनं 'नशीबवान' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे सध्या तो चर्चेत येत आहे.
आदिनाथ कोठारेनं 'स्टार प्रवाह'वरील 'नशीबवान' या नव्या मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक केलं आहे. जी काल १५ सप्टेंबरपासून प्रसारित झाली आहे. '१०० डेज' या मालिकेनंतर आठ वर्षांनी आदिनाथ एका नवीन भूमिकेत दिसतोय. या मालिकेत तो रुद्र प्रताप घोरपडे हे पात्र साकारतो आहे. या मालिकेत आदिनाथ केवळ प्रमुख भूमिका साकारणार नाही, तर तो निर्मात्याची धुरा देखील सांभाळणार आहे. नव्या प्रवासाबद्दल बोलताना आदिनाथने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
आदिनाथ लिहलं, "एक नवी पायवाट.. नवी भूमिका.. हुरहूर.. दडपण.. झेप घेण्या आधीचा मोठा श्वास.. तुमचं प्रेम आणि साथ असुद्या.. बाकी सगळं नशीबावर...". त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव करत त्याला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात.
आदिनाथने यापूर्वीही विविध चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता त्याच्या निर्मिती कौशल्याची झलकही प्रेक्षकांना या नव्या मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्याच्या या नव्या भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आदिनाथच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो अभिनेता रणबीर कपूरच्या 'रामायण' (Ramayana) या बहुप्रतिक्षित सिनेमात 'भरत' ही भूमिका साकारणार आहे. याआधी आदिनाथ बॉलिवूडच्या '८३' या चित्रपटात झळकला होता. त्यानंतर 'क्रिमिनल जस्टिस', 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरिजमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला.