'बंद करू चॅनल'; उर्मिला निंबाळकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:10 IST2022-08-12T15:09:19+5:302022-08-12T15:10:21+5:30
Urmila nimbalkar: उर्मिला प्रसिद्ध युट्यूबर असण्यासोबतच एक लोकप्रिय अभिनेत्रीदेखील आहे.

'बंद करू चॅनल'; उर्मिला निंबाळकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर उर्मिला निंबाळकर (urmila nimbalkar) आजच्या घडीला कोणासाठीही नवीन नाही. सोशल मीडियावर सक्रीय असलेली उर्मिला सातत्याने तिच्या युट्यूब चॅनेलवर चाहत्यांसाठी नवनवीन व्हिडीओ घेऊन घेत असते. यात लाइफस्टाइल, फॅशन, ट्रॅव्हल या तिच्या व्हिडीओंना विशेष पसंती मिळते. मराठीमध्ये हे युट्यूब चॅनेल चालवणाऱ्या उर्मिलाने नुकताच एक युट्यूब स्टुडिओ बांधला असून ही गुड न्यूज तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
"Finally……. आपला स्वतःचा युट्यूब स्टुडीओ बांधून झाला आणि तिथे पहिलं शूटही झालं. चार वर्षापूर्वी मोबाइलवर घरातल्या हॅालमध्ये आमच्या युट्यूब प्रवासाची सुरुवात झाली. तेव्हा लाईट नव्हते, माइकचं बजेट नव्हतं, त्यामुळे बाहेरचा प्रकाश असेपर्यंत पण गोंगाट सुरू व्हायच्या आधी शूटींग पूर्ण करण्याची घाई असायची. दर महिन्याला असं वाटायचं की बंद करूयात चॅनेल, नाही मिळतंय म्हणावा तसा प्रतिसाद. पण दोघं एकमेकांना push करत राहीलो की अजून तीन महिने करू, मग जाऊदे बंद करू चॅनल. स्वतःच्याच चुकांमधून शिकत, विषयांशी, प्रेक्षकांशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहून काम करत राहीलो आणि मग - “लोग साथ आते गए और कारवां बनता गया”. आता स्वतःचीच जागा आहे, बरोबर हुशार लोकांची साथ आहे, आता अजून कमाल काम करता येईल. अतिशय गोंडस बाळ, प्रेमळ पार्टनर, देखणं घर, कष्टाळू टीम, जीवनविद्येचं @jeevanvidyaofficial नॅालेज आणि काय हवं?……", अशी पोस्ट उर्मिलाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
दरम्यान, उर्मिला प्रसिद्ध युट्यूबर असण्यासोबतच एक लोकप्रिय अभिनेत्रीदेखील आहे. तिने 'दुहेरी', 'एक तारा', 'दिया और बाती' या मालिकांमध्ये काम केले आहे. उर्मिलाने२०१२ साली सुकिर्त गुमास्तेसोबत लग्नगाठ बांधली. सुकिर्त हा पेशाने पत्रकार असून एका पब्लिकेशनसाठी तो काम करतो.