कपळावर चंद्राकोर, गळ्यात मंगळसूत्र, अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या साडीतल्या फोटोंनी वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 03:55 PM2022-09-20T15:55:07+5:302022-09-20T15:58:37+5:30

सोनाली कुलकर्णीनं 'अप्सरा आली' या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले.

Actress Sonalee Kulkarni's post viral on internet | कपळावर चंद्राकोर, गळ्यात मंगळसूत्र, अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या साडीतल्या फोटोंनी वेधलं लक्ष

कपळावर चंद्राकोर, गळ्यात मंगळसूत्र, अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या साडीतल्या फोटोंनी वेधलं लक्ष

googlenewsNext

सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'नटरंग' या चित्रपटातून. या चित्रपटात तिने केलेले लावणीनृत्य प्रचंड गाजले. त्यातील 'अप्सरा आली' या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले.

सोनाली तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोनालीने नुकतेच तिचं पैठणी साडीतलं फोटो शेअर केलं आहेत. मावळती चंद्रकोर ती रानफुलाने मोहित झाली निमुळत्या पाकळ्यांनी झुपके दवात भिजुन चंद्र प्याली, असं कॅप्शन दिलंय. अगं बाई.. माझी अप्सरा, अस्सल मराठी सौंदर्य, मराठी रुबाब, अप्सरा, जिंदगी भर युही मुसकराते रहो अशा कमेंट्स  चाहते या फोटोवर करतायेत. 

दरम्यान ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर सोनालीच्या लग्नसोहळ्यांची मालिका प्रदर्शित करण्यात आली.सोनाली कुलकर्णी व कुणाल बेनोडेकर यांनी कोरोना काळात लग्न करून फॅन्सना सुखद धक्का दिला होता.हे लग्न दुबईत झालं. अगदी चार दोन लोकांच्या उपस्थितीत एका मंदिरात अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता. दुबईचं लग्न अगदी सोनाली-कुणालच्या घरच्यांनी आणि मित्र- मैत्रिणींनी व्हिडिओ कॉलवरच पाहिलं होतं. दुबईच्या लग्नात ना विधी होत्या, ना हौस मौज.सोनाली व कुणालनं पुन्हा एकदा विधीवत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हा निर्णय अमलातही आला. यावेळी त्यांनी लग्नासाठी लंडनची निवड केली.

Web Title: Actress Sonalee Kulkarni's post viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.