बाबो! पूजा सावंतने अंगावर खेळवला साप, अजिबात घाबरली नाही; व्हिडीओ पाहून चाहते थक्क
By देवेंद्र जाधव | Updated: August 7, 2025 15:23 IST2025-08-07T15:23:06+5:302025-08-07T15:23:22+5:30
अभिनेत्री पूजा सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पूजा तिच्या हातावर साप खेळवताना दिसत आहे

बाबो! पूजा सावंतने अंगावर खेळवला साप, अजिबात घाबरली नाही; व्हिडीओ पाहून चाहते थक्क
पूजा सावंत ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. पूजाला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. पूजाने काही महिन्यांपूर्वी सिद्धेश चव्हाणसोबत लग्न केलं. सिद्धेश राहायला ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्यामुळे पूजाही कामानिमित्त भारतात येत असते. शिवाय नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात राहते. पूजाने नुकतीच ऑस्ट्रेलियातील कांगारू आयलंडला भेट दिली. तिथे असलेल्या प्राणीसंग्रहालयात पूजाने हातात साप घेतला होता. सध्या पूजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पूजाने हातात साप घेतला अन्...
पूजा सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत पूजा तिचा पती सिद्धेश चव्हाणसोबत ऑस्ट्रेलियातील एका प्राणीसंग्रहालयात गेली आहे. या प्राणीसंग्रहालयात पूजाने विविध प्राणी बघितले. एका व्हिडीओत पूजा तिच्या हातावर सापाला खेळवताना दिसतेय. पूजा अजिबात न घाबरता या सापाला अंगावर खेळवताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून पूजाच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु हे साप बिनविषारी असून त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं गेलं असतं. त्यामुळे हे साप हातावर घेण्यात कोणताही धोका नसतो.
पूजाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्या बिनधास्त स्वभावाचं कौतुक केलंय. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पूजा - सिद्धेशचं लग्न झालं होतं. पूजा-सिद्धेशचा लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला. या लग्नसोहळ्यात कुटुंबासह कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. मराठीतल्या कलरफूलने अर्थात पूजाने लग्नात रॉयल लूकला पसंती दिली होती. हातात हिरवा चुडा, गळ्यात हेवी नेकलेस आणि भरजरी साडी असा गेटअप पूजाने केला होता. तर, सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. पूजा सध्या भारत - ऑस्ट्रेलिया असा प्रवास करताना दिसते.