अक्षय कुमारने श्रेयस तळपदेच्या तब्येतीची विचारपूस केली होती का? पत्नीने दिली माहिती, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 01:13 PM2024-02-12T13:13:05+5:302024-02-12T13:21:02+5:30

श्रेयसच्या तब्येतीबद्दल कळताच अनेकांनी त्याच्यासाठी चिंता व्यक्त करत प्रार्थना करायला सुरुवात केलेली.  

Actor Akshay Kumar concern about friend and Welcome to the Jungle actor Shreyas Talpade after he suffered a heart attack | अक्षय कुमारने श्रेयस तळपदेच्या तब्येतीची विचारपूस केली होती का? पत्नीने दिली माहिती, म्हणाली...

अक्षय कुमारने श्रेयस तळपदेच्या तब्येतीची विचारपूस केली होती का? पत्नीने दिली माहिती, म्हणाली...

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला गेल्या महिन्यात अचानक छातीत दुखू लागल्यामुळे तात्काळ रुग्णालयात भरती केले होते. तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आलं होतं. कोणतंही व्यसन नसलेल्या आणि कायमच फिटनेसकडे लक्ष देणाऱ्या श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. श्रेयसच्या तब्येतीबद्दल कळताच अनेकांनी त्याच्यासाठी चिंता व्यक्त करत प्रार्थना करायला सुरुवात केलेली.  त्या संकटात  श्रेयसच्या बॉलिवूडमधील मित्रमंडळी मदत केल्याचं श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदेने सांगितलं. 

श्रेयस तळपदे याची तब्येत आता हळूहळू सुधारत आहेत. नुकतीच त्यानं एबीपी माझाच्या माझा कट्टा या शोला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याची पत्नी दीप्ती तळपदे देखील त्याच्यासोबत उपस्थित होती. यावेळी या मुलाखतीत श्रेयस आणि दीप्ती यांनी त्या कठीण प्रसंगावर भाष्य केलं. श्रेयसला हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर अनेकांनी मदत केली. सामान्य मुंबईकर ते बॉलिवूड स्टार्स अक्षय कुमार, दिग्दर्शक अहमद खान हे सर्वं जण उभे राहिल्याचं तिनं सांगितलं.  

दिप्ती म्हणाली, श्रेयसच्या आजारपणाची बातमी माहिती झाल्यावर दिग्दर्शक अहमद खान व त्यांची पत्नी हे दोघेही रात्री ११ वाजता रुग्णालयात आले होते. तसेच अक्षयने मला कॉल करुन विचारपूस केली. आपण श्रेयसला दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करूया का? तू सांगशील तिथे आपण व्यवस्था करूया असंही त्यानं म्हटलं'. तर पुन्हा सकाळी त्याने मला फोन केला आणि मला फक्त दोन मिनिटं त्याला बघू दे अशी विनंती केली. मग मी त्याला भेटण्यास बोलावलं. तर मराठी असो किंवा हिंदी दोन्ही कलाविश्वातील कलाकार आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले'.

श्रेयसला १५ डिसेंबर २०२३  मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाच्या शूटिंगवरून परतताना त्याला अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. हृदयविकाराचा झटका आलेल्या श्रेयसला मृत्यूच्या दाढेतून पत्नी दीप्तीने ओढून आणत त्याचे प्राण वाचवले होते. मराठीसह बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा दमदार अभिनेता म्हणून श्रेयस तळपदेला ओळखलं जातं. आजवर त्याने प्रत्येक माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 

Web Title: Actor Akshay Kumar concern about friend and Welcome to the Jungle actor Shreyas Talpade after he suffered a heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.