Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनही 'वेड'च्या प्रेमात; सिनेमाची छप्परफाड कमाई बघून म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 16:12 IST2023-01-08T16:11:35+5:302023-01-08T16:12:26+5:30

रितेश जिनिलियाची क्युट जोडी, तुफान प्रमोशन आणि सुंदर गाणी यामुळे वेड प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणतोय. मराठी प्रेक्षकच नाही तर अख्ख्या बॉलिवुडलाही रितेशने वेड लावलंय.

abhishek-bachchan-praises-riteish-deshmukh-and-genelia-for-the-success-of-their-marathi-movie-ved | Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनही 'वेड'च्या प्रेमात; सिनेमाची छप्परफाड कमाई बघून म्हणतो...

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनही 'वेड'च्या प्रेमात; सिनेमाची छप्परफाड कमाई बघून म्हणतो...

Abhishek Bachchan : महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलियाच्या (Genelia) 'वेड'ने  (Ved Marathi Movie) अक्षरश: नावाप्रमाणेच सर्वांना वेड लावलं आहे. वेड हा मराठी सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटला तरी याची लोकप्रियता वाढतच चालली आहे. रितेश जिनिलियाची क्युट जोडी, तुफान प्रमोशन आणि सुंदर गाणी यामुळे वेड प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणतोय. मराठी प्रेक्षकच नाही तर अख्ख्या बॉलिवुडलाही रितेशने वेड लावलंय. अभिनेता अभिषेक बच्चन याने वेड बद्दल खास पोस्ट शेअर करत रितेशचे कौतुक केले आहे.

'वेड' हा मराठी सिनेमा ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. अवघ्या एका आठवड्यात सिनेमाने धुमाकूळ घालत २३ कोटींचा गल्ला जमवला आहे. मराठी चित्रपटाची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनही 'वेड'चे कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकलेला नाही. वेडच्या कमाईचा फोटो पोस्ट करत त्याने रितेश आणि जिनिलियाचे कौतुक केले आहे. वेड हिट असेही त्याने म्हणले आहे. 

अभिषेकच्या पोस्टवर जिनिलियाने त्याचे आभार मानले आहेत. जिनिलिया म्हणते,'अभिषेक तुझे खूप खूप आभार.तू कायमच माझ्या आणि रितेशसोबत होतास आणि खरंच हे मी उगाच नाही बोलत आहे तर आपण यावर रोज सतत बोलत आलो आहोत.'

'वेड'ची बॉक्सऑफिसवरील कमाई 

Ved Movie Box Office Collection Day 9: मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून रितेश-जिनिलिया भारावले, ‘वेड’ची नवव्या दिवशी छप्परफाड कमाई

पहिल्या आठवड्याभरामध्ये या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे.  चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 2 कोटी 25 लाख रुपये कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 3.25 कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी 4.50 कोटी, चौथ्या दिवशी 3.02 कोटी, पाचव्या दिवशी 2.65 कोटी, सहाव्या दिवशी 2.55 कोटी, सातव्या दिवशी 2.45 कोटींची कमाई केली. आठव्या दिवशी 2.52 कोटींचा गल्ला जमवला. नवव्या दिवशी या सिनेमाने पहिल्या दिवशीपेक्षा दुप्पट म्हणजे सुमारे 5 कोटींचा गल्ला जमवला आहे. नवव्या दिवशीच्या कमाईचा आकडा समोर यायचाय. त्यामुळे ही कमाई थोडी फार कमी जास्त होऊ शकते.

Web Title: abhishek-bachchan-praises-riteish-deshmukh-and-genelia-for-the-success-of-their-marathi-movie-ved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.