रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:26 IST2025-06-10T13:25:48+5:302025-06-10T13:26:11+5:30

अभिनेत्री रेश्मा शिंदेनेही यंदा लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली. याचा व्हिडिओ रेश्माने शेअर केला आहे.

marathi actress reshma shinde celebrated first vat purnima after marriage with husband | रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवती हे व्रत करतात. अनेक मराठी अभिनेत्रीही दरवर्षी वडाच्या झाडाची पूजा करत वटपौर्णिमा साजरी करतात. अभिनेत्री रेश्मा शिंदेनेही यंदा लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली. याचा व्हिडिओ रेश्माने शेअर केला आहे. 

रेश्माने पतीसोबत घरीच वडाच्या झाडाची पूजा केली. विशेष म्हणजे रेश्मासोबत तिचा पती पवननेदेखील वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या. वटपौर्णिमेसाठी रेश्माने पारंपरिक लूक केला होता. तिने हिरव्या रंगाची पैठणी नेसली होती. घरातच वडाच्या झाडाची पूजा करत आणि त्याला फेऱ्या मारत अभिनेत्रीने नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. "माझी पहिली वटपौर्णिमा" असं कॅप्शन देत रेश्माने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 


रेश्माने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पवनसोबत लग्नगाठ बांधली. पवन साऊथ इंडियन असून  त्या दोघांनी महाराष्ट्रीयन आणि साउथ पद्धतीने लग्न केलं. पवनी आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या ७-८ वर्षांपासून तो युकेमध्ये होता. मात्र लग्नानंतर रेश्मासाठी तो भारतात परतला आहे. रेश्माने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. रंग माझा वेगळा मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. सध्या ती घरोघरी मातीच्या चुली मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: marathi actress reshma shinde celebrated first vat purnima after marriage with husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.