"दीपिकालाही याचा सामना करावा लागतोय तर...", लेकीच्या जन्मानंतर मराठी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आलेला 'असा' अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:50 IST2025-11-24T17:40:15+5:302025-11-24T17:50:36+5:30
लेकीच्या जन्मानंतर मराठी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आलेला 'असा' अनुभव, दीपिका पादुकोणबद्दल म्हणाली...

"दीपिकालाही याचा सामना करावा लागतोय तर...", लेकीच्या जन्मानंतर मराठी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आलेला 'असा' अनुभव
Radhika Vidyasagar Reaction On Deepika Statement : गेली अनेक वर्ष हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. आपल्या दमदार अभिनयाने आणि स्टाईलमुळे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही नायिका मागील काही महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आहे. दीपिकाने केलेल्या कामाची मागणी आणि महिला कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर ती बोलल्याने तिच्या या वक्तव्याचं अनेक कलाकार समर्थन देखील करत आहेत. अशातच दीपिकाच्या या निर्णयाबद्दल मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री राधिका विद्यासागरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राधिका विद्यासागरने 'ठिपक्यांची रांगोळी', 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' तिने साकारलेलं सारिका आत्याचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावलं. नुकतीच त्यांनी 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, हल्ली दीपिकाचं आठ तासांची कामाची शिफ्टबद्दलचं वक्तव्य खूप व्हायरल होतंय. तुमच्यावेळी कशी परिस्थिती होती? याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली,"माझ्या डिलिव्हरीनंतर तीन-चार महिन्यांतर मला एका खूप मोठ्या शोची ऑफर आली होती. ते मराठीतील एक खूप मोठं प्रोडक्शन हाऊस होतं, त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. लगेच आपल्याकडे काम आलंय म्हणून मी खूश होते. फक्त मी त्यांना सांगितलं होतं की माझी मुलगी लहान आहे त्यामुळे मला दोन तास आधी सोडा. तेव्हा माझ्याकडे गाडी वगैरे नव्हती. घरी मुलीला सांभाळायला घरी कोण ना कोणतरी येत होतं. तेवढं मॅनेज करा, असं मी त्यांना सांगितलं होतं. पण, त्यांनी नंतर अॅडजस्ट नाही केलं. त्यामुळे खूपच अवघड व्हायचं. मग त्यांनी मला न सांगताच रोल कमी केला. नंतर मला कळलं की त्या मागणीमुळे मला त्यांनी हा निर्णय घेतला. मी सुद्धा त्याचा विचार केला नाही, कारण माझं मूल लहान होतं.आता माझा त्यात किती रोल होता तेही मी विचारलं नाही. एकदा घरी लहान मूल असलं की आपण त्यामध्ये इतके गुरफटतो की शूटिंग आणि इतक गोष्टी करणं जमत नाही. हे खूप अवघड असतं तारेवरची कसरत असते."
पुढे ती म्हणाली, "आणखी एक गोष्ट माझ्यासोबत घडली ती म्हणजे, मी घराची शिफ्टिंग करते होते आणि माझं बाळ लहान होतं. त्यावेळी मी एक मोठा सिनेमा करत होते आणि त्यातही चांगली भूमिका करत होती. घर बदलत असताना मी तेव्हा आजारी पडले. मग त्यांना सांगितलं की मी आजारी पडली आहे आणि माझ्या घरी बाळ आहे. पण, त्यानंतर मीही विचारलं नाही की काय झालं काय नाही. कारण, माझं पहिलं प्राधान्य हे माझं बाळ आणि कुटुंब होतं."
दीपिका पादुकोणबद्दल अभिनेत्री म्हणाली, "आजकाल प्रत्येक इंडस्ट्रीत अशा गोष्टी घडतात. इथे जे कामाचे तास आहेत, ज्याचा सामना दीपिका पादुकोणाही करावा लागतोय तर मग आपण कोण आहोत. मी तर स्वत: ला एका नॉर्मल वर्किंग वुमन समजते. "