दिपाली सय्यदच्या पती अन् मुलाला कधी पाहिलंय का? जाणून घ्या त्यांच्याविषयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 16:46 IST2023-04-14T16:45:49+5:302023-04-14T16:46:27+5:30
Deepali sayyed: दिपाली सय्यदने २००८ मध्ये बॉबी खान याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने कलाविश्वातून ब्रेक घेतला

दिपाली सय्यदच्या पती अन् मुलाला कधी पाहिलंय का? जाणून घ्या त्यांच्याविषयी
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे दिपाली सय्यद (Deepali Sayed). हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम करुन त्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. सध्या त्या राजकारणात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिपाली सय्यद यांच्या पतीची आणि मुलाची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांचा पती आणि मुलगा कोण आणि ते काय करतात ते जाणून घेऊयात.
दिपाली सय्यदने २००८ मध्ये बॉबी खान याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने कलाविश्वातून ब्रेक घेत राजकारणात प्रवेश मिळवला. दिपाली आणि बॉबी यांनी एक मुलगादेखील असून अली असं त्याचं नाव आहे. सध्या तो विदेशात पुढील शिक्षण घेत असल्याचं सांगण्यात येतं.
दिपाली बऱ्याचदा आपल्या लेकासोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतात. अली एक फोटोग्राफर असून त्याने अनेक दिग्गजांचं फोटोशूट केलं आहे.
दरम्यान, दिपाली उत्तम राजकारणी, अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम डान्सरदेखील आहेत. त्यांनी करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, उचला रे उचला व मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटात काम केले आहे.