"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:50 IST2025-10-06T10:49:54+5:302025-10-06T10:50:26+5:30
मलायकाने जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती जे बोलतेय तो अरबाजलाच टोमणा असल्याची चर्चा सुरु आहे.

"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
दिग्दर्शक, अभिनेता अरबाज खानची दुसरी पत्नी शुरा खानने कालच मुलीला जन्म दिला. छोट्या परीच्या आगमनाने खान कुटुंबात आनंदी वातावरण आहे. इकडे अरबाज पुन्हा बाबा झाला असता तिकडे पहिली पत्नी मलायका अरोराने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. तिने एका रिएलिटी शोमधील तिचा जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती जे बोलतेय तो अरबाजलाच टोमणा असल्याची चर्चा सुरु आहे. नक्की काय आहे तो व्हिडिओ?
मलायका अरोरा काही वर्षांपूर्वी 'इंडियाज गॉट टॅलेंट' हा शो होस्ट करत होती. त्याच शोचं एक रील तिने पोस्ट केलं आहे. यात मलायका, शान आणि नवज्योत सिंग सिद्धू परीक्षक आहेत. नवज्योत सिद्धू शेरोशायरीसाठी ओळखले जातात. त्यांनी शोमध्ये एक शेर म्हटला. 'सच्चे प्यार मे कोई सौदेबाजी नही होती' असं ते म्हणतात. यावर मलायका समोर पेपर, पेन घेते आणि म्हणते 'काय काय परत सांगा..सच्चे प्यार मे...?' मलायकाची अशी रिअॅक्शन पाहून सिद्धू पाजीही हसतात आणि म्हणतात, 'सौदेबाजी नही होती'.
मलायकाने कालच्याच दिवशी हा व्हिडिओ शेअर केल्याने तिने एक्स पती अरबाज खानलाच हा टोमणा मारल्याची चर्चा आहे. अरबाज खान आणि मलायकाला अरहान हा २२ वर्षांचा मुलगा आहे. लेकाच्या एका पॉडकास्टमध्येही अरबाज आणि मलायका वेगवेगळ्या एपिसोडमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा अरबाजने घटस्फोटावर भाष्य केलं होतं. तर मलायकाने दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा ती अर्जुन कपूरला डेट करत होती आणि दोघं लग्न करणार अशीही तेव्हा चर्चा होती.