चेहरा लपवत महाकुंभमेळ्यात पोहचला 'हा' सेलिब्रिटी, गंगेत डुबकी मारली, तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 14:04 IST2025-01-26T14:03:51+5:302025-01-26T14:04:11+5:30

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १३ जानेवारी २०२५ पासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे.  

Mahakumbh 2025 Update Remo Dsouza Reached Prayagraj Share Video | चेहरा लपवत महाकुंभमेळ्यात पोहचला 'हा' सेलिब्रिटी, गंगेत डुबकी मारली, तुम्ही ओळखलं का?

चेहरा लपवत महाकुंभमेळ्यात पोहचला 'हा' सेलिब्रिटी, गंगेत डुबकी मारली, तुम्ही ओळखलं का?

Maha Kumbh Mela 2025: सनातन धर्मात कुंभाचं विशेष महत्त्व आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १३ जानेवारी २०२५ पासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे.  कुंभमेळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या  कुंभमेळ्यात देश-विदेशातील लोक सहभागी होत आहेत. बॉलिवूड अभिनेता आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा (Remo D'souza Reached Maha Kumbh) देखील महाकुंभात पोहोचला.

रेमो डिसुझानं त्याला लोकांनी ओळखू नये म्हणून काळ्या कापडाने चेहरा झाकला. या लूकमध्ये त्याला ओळखणेही कठीण झालं. परंतु संगमजवळील पायऱ्यांवरून जाताना एका महिलेने त्याला ओळखलं. त्या महिलेने रेमो डिसूझाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो पुढे सरकला. रेमोने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी पत्नी लिझेल देखील त्याच्यासोबत दिसली. रेमोनं मोठ्या भक्तीभावाने गंगास्नान केलं. त्यानं पत्नीसह स्वामी कैलाशानंद गिरी महाराजांचे प्रवचनही ऐकलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

 रेमोला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. यावर रेमो म्हणाला, "जर महादेव आणि माझे प्रियजन माझ्यासोबत असतील तर मला काहीही होणार नाही. रेमो डिसूझा एक कोरिओग्राफर, डान्सर, चित्रपट दिग्दर्शक आहे. रेमोचं खरं नाव रमेश गोपी नायर आहे. परंतु त्यानं रेमो डिसूझा म्हणून फिल्म इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली. 


रेमोचा जन्म २ एप्रिल १९७४ रोजी केरळमधील पलक्कड येथे झाला. त्यांचे वडील गुजरातमधील जामनगर येथे भारतीय हवाई दलात तैनात होते. तो इथेच वाढला. रेमोने 'एबीसीडी' आणि 'स्ट्रीट डान्सर ३डी' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत, जे नृत्यावर आधारित आहेत. त्यानं  'डान्स इंडिया डान्स', 'झलक दिखला जा' आणि 'डान्स प्लस' सारख्या डान्स रिअॅलिटी  शोमध्ये जज म्हणून काम केलं आहे. 

Web Title: Mahakumbh 2025 Update Remo Dsouza Reached Prayagraj Share Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.