क्रिती सेननची बहीण नुपूर सेननने ख्रिश्चन पद्धतीने थाटामाटात केलं लग्न; कोण आहे नवरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 18:21 IST2026-01-11T18:17:48+5:302026-01-11T18:21:19+5:30
क्रिती सेननची बहीण नुपूरने थाटामाटात लग्न केलं आहे. नुपुरच्या लग्नाचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

क्रिती सेननची बहीण नुपूर सेननने ख्रिश्चन पद्धतीने थाटामाटात केलं लग्न; कोण आहे नवरा?
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननची धाकटी बहीण नुपूर सेनन (Nupur Sanon) आणि लोकप्रिय गायक स्टेबिन बेन (Stebin Ben) यांनी थाटामाटात लग्न केलं आहे. आज, ११ जानेवारी २०२६ रोजी हे जोडपे उदयपूरमध्ये एका शाही सोहळ्यात लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
नुपूर आणि स्टेबिन यांनी उदयपूरमध्ये 'व्हाईट वेडिंग' (White Wedding) म्हणजेच ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. यावेळी नुपूरने पांढऱ्या रंगाचा अतिशय सुंदर गाऊन परिधान केला होता, तर स्टेबिनने त्याला साजेसा असा पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता. या जोडप्याने लग्नानंतरचे काही रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून, एका फोटोमध्ये ते एकमेकांना 'लिपलॉक' करताना दिसत आहेत. स्टेबिन हा लोकप्रिय गायक असून त्याने गायलेली गाणी चांगलीच गाजली आहेत.
या खास सोहळ्यासाठी सेनन आणि बेन कुटुंबातील सदस्य तसेच जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. क्रिती सेनन आपल्या बहिणीच्या लग्नात अतिशय आनंदी दिसत होती. याशिवाय बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती. अभिनेत्री दिशा पटानी आणि मौनी रॉय यांनी आपल्या ग्लॅमरस लूकने या लग्नात सर्वांचं लक्ष वेधलं.
नुपूर आणि स्टेबिन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी कधीही आपले नाते लपवून ठेवले नाही आणि अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले होते. त्यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती आणि अखेर आज त्यांनी अधिकृतपणे लग्न करुन आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर या नवविवाहित जोडप्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. "दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत," अशा कमेंट्स अनेक युजर्सनी केल्या आहेत.