खेसारी लाल यादवचे 'छेड़ा न पिया' गाणे का होतंय ट्रेंड? आत्तापर्यंत तब्बल 5० लाख लोकांनी पाहिलं हे गाणं, मोडले सगळे रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 01:17 PM2020-10-05T13:17:20+5:302020-10-05T13:17:55+5:30
खेसारी आणि काजलची जोडी भोजपुरी इंडस्ट्रीत सर्वाधिक सुपरहिट ऑन स्क्रीन जोडी मानली जाते. 'मेहंदी लगा के रखना' 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमासाठी खेसारीला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचाही पुरस्कार मिळाला होता.
![Khesari Lal Yadav's song 'Chheda Na Piya' Has Been Watched By Over 50 Lakh People till now, breaking all records | खेसारी लाल यादवचे 'छेड़ा न पिया' गाणे का होतंय ट्रेंड? आत्तापर्यंत तब्बल 5० लाख लोकांनी पाहिलं हे गाणं, मोडले सगळे रेकॉर्ड Khesari Lal Yadav's song 'Chheda Na Piya' Has Been Watched By Over 50 Lakh People till now, breaking all records | खेसारी लाल यादवचे 'छेड़ा न पिया' गाणे का होतंय ट्रेंड? आत्तापर्यंत तब्बल 5० लाख लोकांनी पाहिलं हे गाणं, मोडले सगळे रेकॉर्ड](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/whatsapp-image-2020-10-05-at-1.16.57-pm_202010500023.jpeg)
खेसारी लाल यादवचे 'छेड़ा न पिया' गाणे का होतंय ट्रेंड? आत्तापर्यंत तब्बल 5० लाख लोकांनी पाहिलं हे गाणं, मोडले सगळे रेकॉर्ड
युट्यूबवर भोजपुरी गाण्यांना विशेष पसंती मिळते. सोशल मीडियामुळे भोजपुरी गाणे रसिकांपर्यंत पोहचत आहेत. ट्रेंडिंग व्हिडिओमध्येही भोजपुरी गाणीच सर्वाधिक हिट असल्याचे पाहायला मिळतंय. भोजपुरी गाणी बर्याचदा कलाकारांच्या रोमँटीत जोडीमुळे लक्ष वेधून घेतात.त्यात खेसारीलाल यादव आणि अभिनेत्री काजल या दोघांची फेव्हरेट जोडी आहे. या दोघांवर चित्रीत झालेली भोजपुरी गाणी चांगलीच गाजली आहेत आणि यूट्यूबवर सुपरहिट ठरली आहेत.
खेसारी लाल यादवचे असेच एक गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. विशेष म्हणजे हे गाणे नवीन नसून जुनेच आहे खेसारीचे असे जुने गाण्याचे व्हिडीओही पुन्हा एकदा ट्रेंड होत आहेत. त्यापैकीच 'छेड़ा न पिया' हे गाणे सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. . २०१९मध्ये या गाण्याने प्रचंड धुमाकुळ घातला होता. आता पुन्हा पुन्हा हे गाणे पाहिले जात आहे. या गाण्याचे आत्तापर्यंत व्हुज ५० लाख इतेक झाले आहे. त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त भोजपुरीचे गाणे युट्युबवर ट्रेंड होत आहेत.
या गाण्यामुळेच खेसारी लाल यादव आणि काजल राघवानी ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोघांमध्ये रंगलेल्या रोमँटीक केमिस्ट्रीमुळेच हे गाणे सुपरहिट ठरले आहे. खेसारी आणि काजलची जोडी भोजपुरी इंडस्ट्रीत सर्वाधिक सुपरहिट ऑन स्क्रीन जोडी मानली जाते. 'मेहंदी लगा के रखना' 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमासाठी खेसारीला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचाही पुरस्कार मिळाला होता.
एक उत्तम गायक होण्याशिवाय तो एक उत्तम अभिनेता देखील आहे. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांमुळे आणि सुपरहिट चित्रपटांमुळे तो भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी बनला आहे. भोजपुरी चाहते त्याच्या कोणत्याही गाण्याची किंवा चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतात. आता खेसारीचे आणखी एक गाणे चाहत्यांमध्ये हिट ठरले आहे.
खेसारीलाल यादवने 'साजन चले ससुराल' सह भोजपुरी सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या सिनेमाने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. आज तो भोजपुरी सिनेमांचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.