'सिंघम गर्ल'ने एका दिवसात ठेवलं बाळाचं नाव; जाणून घ्या काजल अग्रवालच्या लेकाचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 04:57 PM2022-04-20T16:57:32+5:302022-04-20T16:58:00+5:30

kajal aggarwal:सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौतमने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत बाळाचं स्वागत आहे. तसंच त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली असून बाळाचं नावदेखील जाहीर केलं आहे.

kajal aggarwal and gautam kitchlu name their baby boy neil kitchlu | 'सिंघम गर्ल'ने एका दिवसात ठेवलं बाळाचं नाव; जाणून घ्या काजल अग्रवालच्या लेकाचं नाव

'सिंघम गर्ल'ने एका दिवसात ठेवलं बाळाचं नाव; जाणून घ्या काजल अग्रवालच्या लेकाचं नाव

googlenewsNext

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल (kajal aggarwal) नुकतीच आई झाली आहे. 'सिंघम' (singham) चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या काजलने एका चिमुकल्या मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे. काजलने ही गुडन्यूज दिल्यानंतर तिच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी, बाळाचं नाव जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहे. यामध्येच आता काजलच्या नवऱ्याने गौतम किचलूने (gautam kitchlu) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बाळाचं नाव सांगितलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौतमने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत बाळाचं स्वागत आहे. तसंच त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली असून बाळाचं नावदेखील जाहीर केलं आहे.
 

 "आम्हाला खूप आनंद होतोय, हे सांगतांना की नील किचलूचा जन्म झाला आहे. १९ एप्रिल २०२२. आमच्या मनातील इच्छा आता पूर्ण झाल्या आहेत आणि आम्ही खूप आनंदात आहोत. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादासाठी मनापासून धन्यवाद", अशी पोस्ट गौतमने शेअर केली आहे.

दरम्यान, काजलने बाळाला जन्म दिल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. वर्षाच्या सुरुवातीला काजलने सोशल मीडियावर बेबीबंपसह फोटो शेअर करत ती आई होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तिचे बेबी शॉवरचे फोटोही चर्चेत आले होते. त्यामुळे आता तिने बाळाला जन्म दिल्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे.

Web Title: kajal aggarwal and gautam kitchlu name their baby boy neil kitchlu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.