बिग बॉसच्या घरात जयला मिळाली चित्रपटाची ऑफर; महेश मांजरेकरांच्या 'या' चित्रपटात करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 22:04 IST2021-12-26T22:03:11+5:302021-12-26T22:04:18+5:30
Jay dudhane:बिग बॉसच्या घरात जयला लागली लॉटरी; महेश मांजरेकरांनी दिली आगामी चित्रपटाची ऑफर

बिग बॉसच्या घरात जयला मिळाली चित्रपटाची ऑफर; महेश मांजरेकरांच्या 'या' चित्रपटात करणार काम
छोट्या पडद्यावर सध्या ‘बिग बॉस मराठी 3’चा (Bigg Boss Marathi 3) ग्रँड फिनाले सोहळा रंगत आहे. गेल्या १०० दिवसांपासून या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी आता जय दुधाणे, विकास पाटील आणि विशाल निकम हे तीन स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले आहेत. विशेष म्हणजे बिग बॉस मराठी ३ चा ग्रँड फिनाले सोहळा पूर्ण होण्यापूर्वी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर यांनी जय दुधाणेला त्यांच्या आगामी चित्रपटाची ऑफर दिली आहे. त्यामुळे या घरातून बाहेर पडतांना जयच्या पदरात एक नवा कोरा चित्रपट पडल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या रंगत असलेल्या ग्रँड फिनालेमध्ये महेश मांजरेकर प्रत्येक स्पर्धकाविषयी, त्यांच्यातील क्वालिटीविषयी भाष्य करत आहेत. यामध्येच जयची वाढती लोकप्रियता आणि त्याच्यातील क्वालिटी ओळखून महेश मांजरेकर यांनी त्याला आगामी चित्रपटाची ऑफर दिली आहे.
महेश मांजरेकर यांच्या आगामी 'शनिवार वाडा' या चित्रपटात जय दुधाणे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. तसंच बिग बॉसचा हा ग्रँड फिनाले संपल्यानंतर या चित्रपटाविषयी सविस्तर माहितीदेखील ते देणार आहेत.
दरम्यान, महेश मांजरेकर यांच्या 'शनिवार वाडा' या चित्रपटात जरी जय झळकणार असला तरीदेखील या चित्रपटाविषयी अन्य कोणत्याही बाबींचा खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चित्रपटाची कथा, त्यातील कलाकार या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात असल्याचं पाहायला मिळत आहे.