पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:55 AM2024-05-17T10:55:00+5:302024-05-17T11:11:02+5:30

Jaideep ahlawat: जयदीपने, करीना आणि सैफने तैमुरवर केलेल्या संस्कारांविषयीदेखील भाष्य केलं आहे.

jaideep-ahlawat-shocked-after-seeing-taimur-behaviour-and-manners-praises-kareena-kapoor-saif-ali-khan-parenting | पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'

पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'

बॉलिवूडचं पॉवरफूल कपल सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करिना कपूर-खान (Kareena Kapoor) यांचा लेक तैमुर (Taimur) हा कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. यात बरेचदा त्याच्या वागण्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होतो. अनेकदा त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यात त्याच्या मस्तीखोर स्वभावामुळे नेटकरी त्याच्यावर टीकास्त्र डागतात. इतकंच नाही तर करीना आणि सैफने दिलेल्या संस्कारांवरही प्रश्न उपस्थित करतात. यामध्येच अभिनेता जयदीप अहलावत (Jaideep ahlawat) याने तैमुरच्या वर्तनावर भाष्य केलं आहे.

अलिकडेच जयदीपने 'मॅशबेल इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने तैमुरच्या भेटीचा किस्सा सांगितला. सोशल मीडियावर ट्रोल होणारा तैमुर खऱ्या आयुष्यात अगदी त्याच्या विरुद्ध असल्याचं त्याने म्हटलं आहे.


जयदीपने केलं तैमुरचं कौतुक

'जाने जान' या सिनेमात जयदीप आणि करीना कपूरने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या सेटवर करीना तैमूर आणि जेहला सोबत घेऊन यायची. यावेळी तैमूरच्या भेटीचा किस्सा जयदीपने सांगितला. "तैमूर खूप जिज्ञासू मुलगा आहे. त्याला खूप प्रश्न पडतात आणि तो सतत विचारत असतो. काय चाललं आहे त्यात? तुम्ही कोणती भूमिका करताय? असे कितीतरी प्रश्न तो सतत विचारत असतो", असं जयदीप म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "एकदा सैफ अली खानने त्याला सांगितले की, हे मम्माच्या चित्रपटात मुख्य अभिनेता आहे. त्यावर तैमूरने, ओह...ओके, ऑल द बेस्ट असं म्हणाला. आणि, मोठ्या स्टाइलमध्ये तिथून निघून गेला."

सैफ-करीनाने लेकाला दिलेत चांगले संस्कार

सैफ आणि करीनाने त्यांच्या मुलांना चांगले संस्कार दिले आहेत. जेवतांना अन्न वाया जाऊ नये याकडे ते कटाक्षाने लक्ष देतात. त्यांनी मुलांना अन्नाचं महत्त्व काय असतं हे सांगितलं आहे. या दोघांनी तैमूरला आदर, शिष्टाचार शिकवला आहे. तैमूर खूप स्मार्ट आणि आत्मविश्वासू आहे. 

Web Title: jaideep-ahlawat-shocked-after-seeing-taimur-behaviour-and-manners-praises-kareena-kapoor-saif-ali-khan-parenting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.