उद्याचा शुक्रवार मनोरंजनाने भरलेला, 'हे' चित्रपट आणि सिरीज होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:24 IST2025-06-05T13:23:55+5:302025-06-05T13:24:22+5:30
जाणून घेऊयात या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल...

उद्याचा शुक्रवार मनोरंजनाने भरलेला, 'हे' चित्रपट आणि सिरीज होणार प्रदर्शित
Friday Releases: शुक्रवार हा चित्रपटप्रेमींसाठी सर्वात खास दिवस आहे. या दिवशी थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होतात. हा शुक्रवारीही चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. उद्या ६ जून रोजी अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होण्यास सज्ज आहेत. जाणून घेऊयात या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल...
हाऊसफुल ५ (Housefull 5): निर्माता साजिद नाडियाडवालाचा बहुप्रतिक्षित चित्रपट हाऊसफुल ५ उद्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा आणि फरदीन खान सारखे अनेक चित्रपट कलाकार महत्त्वाच्या भुमिकेत आहेत.
मर्सी फॉर नन: साऊथ कोरियन फिल्म 'मर्सी फॉर नन' (Mercy for None) ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित केली जाणार आहे. या सीरिजमध्ये एक गँगस्टर आपल्या भावाच्या खुन्याचा शोध घेत असतो.
द लाइफ ऑफ चक: हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित सायन्स फिक्शन थ्रिलर द लाइफ ऑफ चक ( The Life of Chuck) उद्या शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मार्वल युनिव्हर्समध्ये खलनायक लोकी बनून चाहत्यांची मने जिंकणारा सुपरस्टार टॉम हिडलस्टन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
ठग लाईफ: साउथ सुपरस्टार कमल हासन यांचा नवीनतम चित्रपट ठग लाईफ (Thug Life) शुक्रवारी नाही तर एक दिवस आधी गुरुवारी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. तथापि, तुम्ही शुक्रवारी तुमच्या कुटुंबासह हा अॅक्शन थ्रिलर पाहण्याची योजना नक्कीच करू शकता.
'गेट अवे: हॉलिवूड चित्रपट 'गेट अवे' ( Get Away) मध्ये हॉरर कॉमेडी आणि मर्डर मिस्ट्री थ्रिलरचा मसाला पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ६ जूनपासून ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर (JioHotstar) स्ट्रीम केला जाणार आहे.
छल कपट: द डिसेप्शन: श्रिया पिळगावकर हिची 'छल कपट: द डिसेप्शन' (Chhal Kapat - The Deception) उद्या ओटीटीवर प्रदर्शित होईल. ही सीरिज तुम्ही र्म ZEE5 वर पाहू शकाल.
'केओ' (K.O) हा चित्रपट ६ जून रोजी नेटफ्लिक्सवर ( Netflix) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये एका भयानक योद्ध्याची कहाणी दाखवण्यात आली आहे.