पत्नीचं अफेअर, पती खूनी! सस्पेन्स अन् क्राईमचा मिलाफ असलेला 'हा' सिनेमा बघताना डोकं चक्रावेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 15:25 IST2025-09-12T15:14:12+5:302025-09-12T15:25:13+5:30

पत्नीचे विवाहबाह्य संबंध, पती बनतो खूनी; प्रेम, सस्पेन्स अन् क्राईमचा मिलाफ असलेला 'हा' सिनेमा पाहताना तुम्ही चक्रावून जाल

wife and husband story deep water suspense thriller romantic movie must watch on ott | पत्नीचं अफेअर, पती खूनी! सस्पेन्स अन् क्राईमचा मिलाफ असलेला 'हा' सिनेमा बघताना डोकं चक्रावेल

पत्नीचं अफेअर, पती खूनी! सस्पेन्स अन् क्राईमचा मिलाफ असलेला 'हा' सिनेमा बघताना डोकं चक्रावेल

OTT Movie: हल्ली थिएटरमध्ये नवीन चित्रपटांची चर्चा असताना अनेक चित्रपट ओटीटीवर देखील प्रदर्शित होत आहेत.त्यामुळे डिजीटल प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक आणि हटके कथानकावर आधारित बरेचसे चित्रपट उपलब्ध आहेत. सध्या रोमँटिक, हॉरर, थ्रिलर आणि सस्पेन्स चित्रपटांना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः रोमँटिक चित्रपटांचा एक विशेष चाहता वर्ग आहे. असाच एक रोमँटिक चित्रपट सध्या ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या रोमँटिक सायकोलॉजिकल चित्रपटाचं नाव डीप वॉटर आहे.

२०२२ साली प्रदर्शित झालेला डीप वॉटर रोमँटिक सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक एड्रियन लाईन यांनी केलं आहे. या बहुचर्चित चित्रपटात हॉलिवूड स्टार बेन एफ्लेक्स आणि अॅना डी अर्मस यांची प्रमुख भूमिका आहे. कोविड-१९ मुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडलं होतं. नंतर अखेर निर्मात्यांनी तो ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. १ तास ५५ मिनिटांच्या या सिनेमाच्या प्रत्येक सीनमध्ये एक अनपेक्षित ट्विस्ट आहे.

असं आहे कथानक

'डीप वॉटर' चित्रपटात विक आणि मेलिंडा नावाच्या एका जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. वैवाहिक आयुष्यात सुखी समाधानी दिसणाऱ्या या जोडप्याच्या आयुष्यात प्रचंड वादळ आहे. नवरा असूनही मेलिंडाचे विवाहबाह्य संबंध असतात. विकला याबद्दल सर्वकाही कल्पना असूनही तो निमुटपणे सगळं काही पाहत असतो. कारण, त्याच्या पत्नीचे ज्या कोणाबरोबर संबंध असतात त्यांच्या खूनमागे विकचाच हात असतो. या सगळ्याची माहिती मेलिंडाली देखील मिळते. प्रेम, हत्या आणि गुढ रहस्याने दडलेल्या या सिनेमातील सर्व गोष्टी खिळवून ठेवणार्‍या आहेत. त्यामुळे अखेरीस विक पोलिसांच्या तावडीत सापडतो का. मेलिंडाचं पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. हा चित्रपट सध्या ओटीटीवर उपलब्ध आहे.

Web Title: wife and husband story deep water suspense thriller romantic movie must watch on ott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.