भारत-अमेरिकेत बंदी, दिग्दर्शकाची झाली हत्या, 'हा' ठरला जगातील सगळ्यात वादग्रस्त सिनेमा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:09 IST2025-04-25T18:09:24+5:302025-04-25T18:09:47+5:30

जगातला सगळ्यात वादग्रस्त सिनेमा असं कोणी म्हटलं तर या सिनेमाचं नाव पहिल्या नंबरवर असेल. या सिनेमाचा विषय इतका आक्रमक आहे की सिनेमा रिलीज होताच दिग्दर्शकाची हत्या करण्यात आली. जाणून घ्या सविस्तर

The most controversial movie in the world name Salò, or the 120 Days of Sodom movie | भारत-अमेरिकेत बंदी, दिग्दर्शकाची झाली हत्या, 'हा' ठरला जगातील सगळ्यात वादग्रस्त सिनेमा!

भारत-अमेरिकेत बंदी, दिग्दर्शकाची झाली हत्या, 'हा' ठरला जगातील सगळ्यात वादग्रस्त सिनेमा!

जगभरात विविध विषयांवर सिनेमे बनत असतात. हे सिनेमे प्रेक्षकांना आवडतात. काही सिनेमांवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करतात. तर काही सिनेमांचा विषय इतका वादग्रस्त असतो की, या सिनेमांवर थेट जगभरातील देशांमध्ये बंदी आणली जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच एक सिनेमाबद्दल. १९७५ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा एक इटालियन सिनेमा असून भारत, अमेरिकासह १०० हून अधिक देशांमध्ये या सिनेमावर बंदी आणली गेली होती. कोणता आहे हा सिनेमा?

हा सिनेमा आहे जगातील वादग्रस्त सिनेमा

१९७५ साली रिलीज झालेल्या या सिनेमाचं नाव आहे 'सालो ऑर द 120 डेज ऑफ सोडोम' (Salò, or the 120 Days of Sodom) हा एक इटालियन चित्रपट आहे, ज्याला जगातील सर्वात वादग्रस्त चित्रपटांपैकी एक मानले जाते. या चित्रपटाचे दिग्दर्शन पियर पाओलो पासोलिनी यांनी केले होते. चित्रपटाची कथा सांगायची तर, चार श्रीमंत आणि भ्रष्ट पुरुष १८ लोकांचं अपहरण करून त्यांच्यावर चार महिन्यांपर्यंत शारीरिक, मानसिक आणि लैंगिक अत्याचार करतात. या चित्रपटात राजकीय भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि मानवी क्रौर्य यांसारख्या गंभीर विषय दिसतात.

चित्रपट रिलीज होताच दिग्दर्शकाची हत्या

या चित्रपटातील अत्यंत हिंसक प्रसंग आणि  लैंगिक दृश्यांमुळे तब्बल १५० हून अधिक देशांमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काही दिवसांतच म्हणजे २ नोव्हेंबर १९७५ रोजी दिग्दर्शक पियर पाओलो पासोलिनी यांची हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह इटलीतील ओस्तिया समुद्रकिनाऱ्यावर सापडला होता. त्यांच्या हत्येचा तपास आजही अनेक रहस्यांनी भरलेला आहे.  'Salò, or the 120 Days of Sodom' हा चित्रपट आजही जगभरातील सिनेमाप्रेमी आणि समीक्षकांमध्ये चर्चेचा विषय आहे. हा सिनेमा कुठेच बघायला उपलब्ध नाही. युट्यूबवर या सिनेमाच्या छोट्या क्लिप्स सापडतील परंतु पूर्ण सिनेमा सध्या प्रेक्षकांना कुठेच पाहायला मिळणार नाही.

Web Title: The most controversial movie in the world name Salò, or the 120 Days of Sodom movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.