महिलांना इम्प्रेस करण्यासाठी मॅथ्यू मॅकोनहेचा यशस्वी फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 12:27 IST2016-12-25T22:01:16+5:302016-12-29T12:27:48+5:30

अभिनेता मॅथ्यू मॅकोनहे मुलींना इंप्रेस करण्यासाठी अनोखी शक्कल लढविली होती. यासाठी तो आॅस्ट्रेलियाई भाषा (एक्सेंट) अवगत असल्याचे महिलांना भासवित असे. ...

Matthew McConnell's successful fund to impress women | महिलांना इम्प्रेस करण्यासाठी मॅथ्यू मॅकोनहेचा यशस्वी फंडा

महिलांना इम्प्रेस करण्यासाठी मॅथ्यू मॅकोनहेचा यशस्वी फंडा

िनेता मॅथ्यू मॅकोनहे मुलींना इंप्रेस करण्यासाठी अनोखी शक्कल लढविली होती. यासाठी तो आॅस्ट्रेलियाई भाषा (एक्सेंट) अवगत असल्याचे महिलांना भासवित असे. विशेष म्हणजे त्याचा हा फंडा महिलांना इम्प्रेस करण्यात काही अंशी यशस्वीही ठरला होता. 

फिमेलफर्स्ट डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मॅथ्यूने जवळपास एक वर्ष न्यू साउथ वेल्स येथे वास्तव्य केले आहे. त्यावेळी त्याचे वय १९ वर्ष इतके होते. येथून अमेरिकेला परतल्यानंतर तो इतरांना विशेषत: महिला आणि मुलींना असे भासवित असे की, त्याला आॅस्ट्रेलियाई भाषा अवगत आहे. तसेच ही भाषा शिकण्यासाठी त्याला एक वर्ष लागल्याचेही सांगत असे. 

मॅथ्यू मॅकोनहेने गेल्या गुरुवारी झालेल्या ‘लेट नाइट विद सेथ मेयर्स’ या शोमध्ये सांगितले की, महिलांना त्यातही मुलींना ‘आॅस्ट्रेलियाई’ भाषेत संवाद साधल्याचे आवडत असे. त्यामुळे मी शक्यतो महिलांसोबत हा प्रयोग करीत होतो. जवळपास एक वर्ष मी हे नाटक करीत होतो. त्याचा काही अंशी मला फायदा झाल्याचेही मॅथ्यूने सांगितले. 



मॅथ्यू मॅकोनहे त्याची पत्नी कॅमेला एल्वेससोबत

Web Title: Matthew McConnell's successful fund to impress women