सुपरस्टार लिओनार्डो डिकॅप्रियोचं भारताशी आहे खास नातं, जाणून थक्कच व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:39 IST2025-12-26T11:35:34+5:302025-12-26T11:39:58+5:30
टायटॅनिक फेम अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओचं भारताशी खास नातं आहे. वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

सुपरस्टार लिओनार्डो डिकॅप्रियोचं भारताशी आहे खास नातं, जाणून थक्कच व्हाल
'टायटॅनिक' फेम अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ हा सर्वांचा आवडता अभिनेता. लिओनार्डोने गेली अनेक वर्ष विविध सिनेमांमध्ये काम करुन स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. इतकंच नव्हे तर, 'द रेव्हनंट' सिनेमासाठी लिओनार्डोला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लिओनार्डोचं भारताशी एक खास नातं आहे. तुम्हाला त्याबद्दल माहितीये का? वाचून थक्कच व्हाल
लिओनार्डोचं भारताशी खास नातं कसं?
टाइम पत्रिकाशी बोलताना लिओनार्डोने हा खास खुलासा केला. लिओनार्डोची सावत्र आई ही शिख समाजातील आहे. लिओनार्डोची सावत्र आई पेगी या अमृतधारी शिख असून त्या पारंपरिक शिख पोशाख आणि पगडी परिधान करताना दिसतात. त्यामुळे लिओनार्डोचंही भारताशी एक खास नातं आहे. काही वर्षांपूर्वीच पेगी यांनी शिख पोशाख परिधान करायला सुरुवात केली.
पेगी यांनी १९९५ साली लिओनार्डोचे वडील जॉर्ज डिकॅप्रियोसोबत लग्न केलं. त्यानंतर पेगी यांनी एका मुलाला जन्म दिला. एडम फेरार हा लिओनार्डोचा सावत्र भाऊ आहे. लिओनार्डोचे सावत्र आई आणि भावाशीही चांगले संंबंध आहेत. अशाप्रकारे लिओनार्डोची नाळ भारताशी जोडली गेली आहे. लिओनार्डोच्या वर्कफ्रंटबद्दल सांंगायचं तर, तो नुकतंच 'वन बॅटल आफ्टर अनदर' या सिनेमात झळकला. लिओनार्डोच्या या नवीन सिनेमाचंही चांगलंच कौतुक झालं.