लोकप्रिय गायक जस्टिन बीबरवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:14 IST2025-04-27T14:10:59+5:302025-04-27T14:14:44+5:30
पॉप सिंगर जस्टिनच्या पर्सनल लाईफमध्ये सध्या खळबळ माजल्याची चर्चा आहे.

लोकप्रिय गायक जस्टिन बीबरवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास
Justin Bieber: प्रसिद्ध कॅनेडियन पॉप गायक जस्टिन बीबरचे जगभरात चाहते आहेत. जस्टिनचा मोठा चाहतावर्ग असून तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या जस्टिन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पॉप सिंगर जस्टिनच्या पर्सनल लाईफमध्ये सध्या खळबळ माजल्याची चर्चा आहे. एकिकडे जस्टिन बीबर आणि त्याची पत्नी हेली यांच्या नात्यात सध्या सर्व काही आलबेल नसल्याची चर्चे आहे. यासोबतच जस्टिन प्रकृतीही स्वस्थ नसून तो तब्येतीच्या समस्यांमुळे त्रस्त आहे. यातच आता त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जस्टिन बीबरचे आजोबा ब्रूस डेल यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन (Justin Bieber Grandfather Passed Away) झाले. जस्टिन बीबरने इंस्टाग्रामवर आजोबांसोबतचा फोटो पोस्ट केलाय. कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "मी तुम्हाला स्वर्गात भेटेन. तोपर्यंत मला माहित आहे की तुमचं माझ्यावर लक्ष असेल. मला तुमची आठवण येते. मला वेदना होतील, पण, मी आपण एकत्र घालवलेल्या सर्व क्षणांची आठवण काढेल", असं जस्टिननं म्हटलं. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनीही श्रद्धांजली वाहिली.
ब्रूस डेल हे जस्टिनची आई पॅटी मॅलेटचे वडील होते. जस्टिन बीबरच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे. ते कायम जस्टिनच्या पाठीशी खंबरीपणे उभे होते. जस्टीन भारतातही खूप लोकप्रिय आहे. त्याचं 'बेबी' हे गाणं तर आयकॉनिक आहे. याच गाण्यामुळे त्याला पहिल्यांदा जगभरात प्रसिद्धी मिळाली. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ग्रॅमी जिंकणाऱ्या जस्टिन बीबरने अनेक जागतिक विक्रम केले आहेत. जगभरात जस्टिनच्या गाण्यांची क्रेझ आहे.