जेम्स बॉण्ड विकतोय ‘पान मसाला’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2016 06:16 PM2016-10-08T18:16:42+5:302016-10-08T18:16:42+5:30

‘माय नेम इज पान बहार’ असं म्हणत चक्क जेम्स बॉण्ड ‘पान मसाला’ विकताना दिसणार आहे. बॉण्डपटात स्वत:ची कारकीर्द गाजविणारा ...

James Bond Vickoteau 'Pan Masala' | जेम्स बॉण्ड विकतोय ‘पान मसाला’

जेम्स बॉण्ड विकतोय ‘पान मसाला’

googlenewsNext
class="news-image" style="position: relative;">‘माय नेम इज पान बहार’ असं म्हणत चक्क जेम्स बॉण्ड ‘पान मसाला’ विकताना दिसणार आहे. बॉण्डपटात स्वत:ची कारकीर्द गाजविणारा अभिनेता पियर्स ब्रॉसनन स्मार्ट ब्रॉण्ड म्हणून ओळखला जातो. आता स्मार्ट बॉण्ड पान मसाला विकताना दिसत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
आयरिश अभिनेता पियर्स ब्रॉसनन याला पान मसालाने ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले आहे. जेव्हा गेल्या शुक्रवारी पियर्स ब्रॉसननचा पान मसाला विकतानाचा व्हिडीओ समोर आला तेव्हा एकच खळबळ उडाली. भारतीय बाजारपेठेत तर अनेकांना या व्हिडीओमुळे धक्काच बसला. सध्या हा व्हिडीओ यू-ट्यूबवर असून, लवकरच टीव्हीवरील जाहिरातीत झळकणार आहे. व्हिडीओमध्ये पियर्स ब्रॉसनन पान बहारचा डब्बा घेवून दिसत असून, बॉण्ड स्टाइलमध्ये विरोधकांवर मात करीत आहे. व्हिडीओमध्ये अखेरीस तो म्हणतो की, ‘क्लास कधीच स्टाइलच्या बाहेर जात नाही’ 
ही जाहिरात सध्या यू-ट्यूबबरोबरच वर्तमानपत्र, टीव्ही, होर्डिग्जवर देखील झळकत आहे. ब्रॉसननने जेम्स बॉण्ड सीरिजच्या पाचव्या सीजनमधील ‘गोल्डन आय’, ‘टूमारो नेव्हर डाइज’, ‘द वर्ल्ड इज नॉट इनफ’, ’डाय अनादर डे’ या बॉण्डपटांमध्ये काम केलेले आहे. या बॉण्डपटानंतर एक स्मार्ट गुप्तहेर अशी त्याची ओळख निर्माण झाली होती. 
दरम्यान भारतीय कंपन्यांमध्ये या जाहिरातीमुळे खळबळ उडाली असून, सध्या सोशल मीडियावर ब्रॉसननवर मजेशीर किस्से शेअर केले जात आहेत. याचीच संधी साधून पान बहार आणि पियर्स ब्रॉसनन टीव्हीवर ट्रेंड करीत आहेत. 

Web Title: James Bond Vickoteau 'Pan Masala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.