भारतीय वंशाच्या अमेरिकन संगीतकार चंद्रिका टंडनने पटकावला ग्रॅमी पुरस्कार, अल्बमचं नाव आहे 'त्रिवेणी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:38 IST2025-02-03T15:36:30+5:302025-02-03T15:38:49+5:30
यावर्षी झालेल्या ६७ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट संगीताकर, गायकांचा गौरव करण्यात आला.

भारतीय वंशाच्या अमेरिकन संगीतकार चंद्रिका टंडनने पटकावला ग्रॅमी पुरस्कार, अल्बमचं नाव आहे 'त्रिवेणी'
एकीकडे अमेरिकेतील साऊथ कॅलिफोर्निया येथे लागलेल्या आगीने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे अमेरिकी म्युझिक इंडस्ट्रीत सुरु असलेल्या क्रायसिसनंतर पहिला मोठा म्युझिकल इव्हेंट आयोजित करण्यात आला. यावर्षी झालेल्या ६७ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट संगीताकर, गायकांचा गौरव करण्यात आला. ९४ कॅटेगरींमध्ये ८४ विजेत्यांना पुरस्कार मिळाले.
६७ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात मूळ भारतीय वंशाची अमेरिकी गायिका चंद्रिका टंडनने (Chandrika Tandon) सर्वोत्कृष्ट न्यू एज चँट, अँबियन्स श्रेणीमध्ये 'त्रिवेणी' अल्बमसाठी पुरस्कार प्राप्त केला. 'त्रिवेणी' अल्बमचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आजच्या संगितासह वैदिक मंत्रही आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत, नवीन पिढीचा अँबियन्स आणि ग्लोबल परंपरांचं हे मिश्रण आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर चंद्रिका यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "मला खूपच आनंद झाला आहे. या श्रेणीमध्ये इतरही कितीतरी चांगली नामांकनं होती. आम्हाला हा पुरस्कार मिळाला हे कर सोन्याहून पिवळं. आमच्यासोबत नामांकनं मिळालेले इतर संगीतकारही अप्रतिम होते.