दारु-ड्रग्जचं व्यसन, स्मरणशक्ती गेली, साखरपुडाही मोडला; असं होतं 'फ्रेंड्स' स्टार मॅथ्यू पेरीचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 10:55 AM2023-10-29T10:55:22+5:302023-10-29T10:56:22+5:30

'फ्रेंड्स'च्या असंख्य चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

FRIENDS star methew perry found dead he was addicted to drugs never got married | दारु-ड्रग्जचं व्यसन, स्मरणशक्ती गेली, साखरपुडाही मोडला; असं होतं 'फ्रेंड्स' स्टार मॅथ्यू पेरीचं आयुष्य

दारु-ड्रग्जचं व्यसन, स्मरणशक्ती गेली, साखरपुडाही मोडला; असं होतं 'फ्रेंड्स' स्टार मॅथ्यू पेरीचं आयुष्य

जगभरात लोकप्रिय झालेला हॉलिवूडचा कॉमेडी शो F.R.I.E.N.D.S मध्ये चँडलर बिंग ही भूमिका साकारणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचं (Matthew Perry)निधन झालं आहे. ही बातमी कळताच 'फ्रेंड्स'च्या असंख्य चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ५४ वर्षीय अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृतदेह घरात बाथटबमध्ये आढळून आला. हॉलिवूड इंडस्ट्रीसाठी हा मोठा धक्का आहे.

माध्यम रिपोर्ट्सनुसार, मॅथ्यू पेरी लॉस एंजिलिस येथे वास्तव्यास होता. हॉटटबमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. ९० च्या दशकातील 'फ्रेंड्स' या  कॉमेडी सिरीजची आजही चाहत्यांमध्ये तितकीच क्रेझ आहे. मॅथ्यू पेरी याने चँडलर बिंग या सॅरकॅझम असणाऱ्या तरुणाची भूमिका साकारली. मॅथ्यूचेही अनेक चाहते आहेत. दरम्यान ड्रग्जमुळे मध्यंतरी तो चर्चेतही आला होता. 

लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट 

19 ऑगस्ट 1969 साली मॅथ्यू पेरीचा जन्म झाला. तो केवळ १ वर्षांचा असताना त्याची जर्नलिस्ट आई सुजैन आणि वडील अमेरिकन अभिनेता जॉन बेनेट पेरी वेगळे झाले. यानंतर त्याच्या आईने कॅनडाचे जर्नलिस्ट कीथ मॉरिसनशी दुसरं लग्न केलं. यामुळेच मॅथ्यूकडे अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचं नागरिकत्व होतं. 

मॅथ्यू कॉलेजच्या दिवसात टॉप रँक टेनिस खेळाडू होता. मात्र त्याला अभियाची आवड असल्याने त्याने स्पोर्ट्समध्ये करिअर बनवलं नाही. १५ वर्षांचा असताना तो कॅनडा सोडून अमेरिकेत आला. इथेच त्याने ग्रॅज्युएशन केले.  मॅथ्यूला पहिला ब्रेक टीव्ही सिरीज 'सेकंड चान्स' मधून मिळाला. मात्र फ्रेंड्स सिरीजने त्याला खरी लोकप्रियता मिळाली.

दारु-ड्रग्जचं व्यसन

मॅथ्यूचं प्रोफेशनल आयुष्य यशस्वी असतानात वैयक्तिक आयुष्यात मात्र खूप उलथापालथ होती. १९९७ मध्ये तो यशाच्या शिखरावर बोता. दरम्यान जेट स्की अपघातामुळे त्यावा विकोडिनचं व्यसन लागलं. दारुच्या आहारी गेला. जेव्हा तो टेक्सासमध्ये 'सर्विंग सारा' चं शूट करत होता तेव्हा त्याला अचानक पोटात दुखायला लागलं. नंतर त्याला अॅडमिट करण्यात आलं.  दारु आणि ड्रग्जच्या व्यसनामुळे त्याला पॅनक्रियाटिक आजार झाला. २००१ मध्ये तो रिहॅब सेंटरमध्ये गेला. त्याच्या तब्येतीवर खूप परिणाम झाला. त्याच्या नशमुळे त्याला फ्रेंड्स सिरीजचा तिसरा आणि ६ व्या सिझनदरम्यानचा तीन वर्षांचा वेळ लक्षातच नव्हता. 

साखरपुडा मोडला

मॅथ्यू पेरीने अनेक अभिनेत्रींना डेट केले पण कधीच लग्न केले नाही. यासमीन ब्लीथ, ज्यूलिया रॉबर्ट्स आणि लिजी कैपलानसोबत तो अनेत वर्ष रिलेशनशिपमध्ये होता. २०२० मध्ये त्याने लिट्रेरी मॅनेजर मॉली हर्विट्ससोबत साखरपुडा केला. मात्र एका वर्षातच त्यांचं नातं तुटलं.

Web Title: FRIENDS star methew perry found dead he was addicted to drugs never got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.