लोकप्रिय अभिनेत्याची 'मार्व्हल'मध्ये एन्ट्री, रॉबर्ट डाउनी ज्युनियरसोबत झळकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 15:52 IST2024-08-08T15:47:08+5:302024-08-08T15:52:41+5:30

मार्व्हल ही आज जगातील सर्वात मोठी सुपरहीरो फ्रँचायझी आहे.

Dhanush to join Robert Downey Jr. in Russo Brothers’ Avengers Doomsday Marvel | लोकप्रिय अभिनेत्याची 'मार्व्हल'मध्ये एन्ट्री, रॉबर्ट डाउनी ज्युनियरसोबत झळकणार?

लोकप्रिय अभिनेत्याची 'मार्व्हल'मध्ये एन्ट्री, रॉबर्ट डाउनी ज्युनियरसोबत झळकणार?

Dhanush In Avengers Doomsday :मार्व्हलने  (MCU) जगाला आयर्न-मॅन, कॅप्टन-अमेरिका, ब्लॅक पँथरसारखे सुपरहीरो दिले. मार्व्हल ही आज जगातील सर्वात मोठी सुपरहीरो फ्रँचायझी आहे. यातला साऱ्या जगाला भुरळ घालणारा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका सुपरहिरो 'आयर्न मॅन'ची भूमिका साकारणारा प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअरची तर गोष्ट वेगळी आहे. आता रॉबर्ट डाउनी ज्युनिअरसोबत झळकण्याची संधी भारतातील एका लोकप्रिय अभिनेत्याला मिळाली आहे. 

नुकतंच मार्व्हल फिल्म स्टुडिओजने 'ॲव्हेंजर्स: डूम्सडे' आणि 'ॲव्हेंजर्स: सिक्रेट वॉर' या चित्रपटांची घोषणा केली आहे. याच चित्रपटांतील 'ॲव्हेंजर्स: डूम्सडे' या चित्रपटात दाक्षिणात्य स्टार धनुष (Dhanush) रॉबर्ट डाउनी ज्युनियर बरोबर दिसणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.  हे दोन अभिनेते, तेही मार्व्हल चित्रपटात एकत्र आले तर काय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

धनुषने आपल्या लाजवाब अभिनयाने  जगभरातील प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. धनुषने २०१३ मध्ये आलेल्या 'रांझना'चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. २०२२ मध्ये त्याने 'द ग्रेमॅन' या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. आता धनुष मार्व्हल चित्रपटात रॉबर्ट डाउनी ज्युनियर बरोबर दिसणार अशी चर्चा आहे. ही बातमी खरी ठरली तर ग्रे मॅननंतर धनुषचा हा दुसरा हॉलिवूडपट असेल.

 

Web Title: Dhanush to join Robert Downey Jr. in Russo Brothers’ Avengers Doomsday Marvel