आरारारा खतरनाक! कॅप्टन अमेरिकासोबत हॉलिवूड सिनेमात दिसणार धनुष, वाचा काय असणार कथा.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 11:19 IST2020-12-18T11:18:42+5:302020-12-18T11:19:43+5:30

या सिनेमात हॉलिवूड स्टार क्रिस इवांस, रायन गॉसलिंग आणि अना दे अर्मस सारखे मोठे स्टारही दिसणार आहेत. या सिनेमात आता धनुषचं नाव कन्फर्म झाल्याचं समजतं.

Dhanush bags hollywood film the grey man with Chris Evans and Ryan Gosling | आरारारा खतरनाक! कॅप्टन अमेरिकासोबत हॉलिवूड सिनेमात दिसणार धनुष, वाचा काय असणार कथा.....

आरारारा खतरनाक! कॅप्टन अमेरिकासोबत हॉलिवूड सिनेमात दिसणार धनुष, वाचा काय असणार कथा.....

साउथचा सुपरस्टार धनुषन हिंदी इंडस्ट्रीत बऱ्यापैकी आपली जागा निर्माण केलीये. आता धनुषहॉलिवूड सिनेमात बघायला मिळणार आहे. धनुषला 'द ग्रे मॅन' या हॉलिवूड सिनेमात कास्ट केलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन Avengers Endgame बनवणारा दिग्दर्शक रूसो ब्रदर्स करणार आहे. तसेच या सिनेमात हॉलिवूड स्टार क्रिस इवांस, रायन गॉसलिंग आणि अना दे अर्मस सारखे मोठे स्टारही दिसणार आहेत. या सिनेमात आता धनुषचं नाव कन्फर्म झाल्याचं समजतं.

धनुषचा दुसरा हॉलिवूड सिनेमा

धनुषचा हा पहिला हॉलिवूड सिनेमा नाही. यााआधी धनुषने 'द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर' मध्येही काम केलं आहे. हा सिनेमा २०१८ मध्ये रिलीज झाला होता आणि समीक्षकांनी प्रशंसाही केली होती. आता 'द ग्रे मॅन' एक स्पाय थ्रीलर सिनेमा असल्याचं सांगितलं जात आहे आणि याचं बजेट २०० मिलियन डॉलर असल्याचं समजतं. हा सिनेमा मार्क ग्रीनी यांच्या २००९ मध्ये आलेल्या कादंबरीवर बनवलं जात आहे.

काय असेल कथा?

या सिनेमाची कथा एका प्रोफेशनल खून्यावर आधारित आहे. तो कधीकाळी सीआयएसाठी काम करायचा. या खून्याची भूमिका रायन गॉसलिंग साकारेल. क्रिस इवांस सीआयए टीममधील सहकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं शूटींग जानेवारीत लॉस एंजेलिसमध्ये सुरू होणार आहे. मात्र, अजून धनुषच्या भूमिकेबाबत माहिती मिळू शकली नाही.

वर्क फ्रंटबाबत सांगायचं तर धनुष 'अतरंगी रे' या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. आनंद एल राय यांच्या या सिनेमात धनुषसोबत अक्षय कुमार आणि सारा अली खानही मुख्य भूमिकेत असतील. या सिनेमाचं शूटींग सुरू झालं असून पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
 

Web Title: Dhanush bags hollywood film the grey man with Chris Evans and Ryan Gosling