Video: 'कोल्डप्ले'च्या अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये क्रिस मार्टिनने 'वंदे मातरम' गाताच प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:15 IST2025-01-27T13:11:20+5:302025-01-27T13:15:00+5:30
'कोल्डप्ले'च्या गायकांनी अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये 'वंदे मातरम' आणि माँ तुझे सलाम गाणं गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

Video: 'कोल्डप्ले'च्या अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये क्रिस मार्टिनने 'वंदे मातरम' गाताच प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध
जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बँड 'कोल्डप्ले' सध्या भारतात आहे. या बँडची टूर सध्या भारतातील विविध राज्यांमध्ये सुरु आहे. सुरुवातीला नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममघ्ये 'कोल्डप्ले' बँडने परफॉर्म केलं. नंतर अहमदाबादमधीलनरेंद्र मोदी स्टेडियममध्ये २६ जानेवारी २०२५ ला 'कोल्डप्ले'चा आणखी एक शो झाला. यावेळी सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी हजेरी लावली. अशातच 'कोल्डप्ले' कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये 'कोल्डप्ले' बँडमधील गायक क्रिस मार्टिनने 'वंदे मातरम' आणि 'माँ तुझे सलाम' गाणं गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केलंय.
'कोल्डप्ले'च्या गायकांनी गायलं वंदे मातरम
कोल्डप्ले बँडच्या गायकांचा काल अहमदाबादमध्ये शो झाला. त्यावेळी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत 'कोल्डप्ले' बँडच्या गायकांनी प्रेक्षकांसाठी 'वंदे मातरम' गाणं गायलं. इतकंच नव्हे तर 'माँ तुझे सलाम' गाणंही गायलं. 'कोल्डप्ले'चा गायक क्रिस मार्टिन आणि त्याच्या साथीदाराने हे गाणं गाताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. याशिवाय 'कोल्डप्ले'च्या गायकांनी केलेल्या परफॉर्मन्सला मनमुराद दाद दिली.
Chris Martin singing "Vande Mataram" 🥹 Republic Day Special😻
— Vi (@Wanderer_vi) January 26, 2025
Ending it with "Salute to Mother India" 🫶🫶#ColdplayAhmedabad#RepublicDay2025#गणतंत्र_दिवसpic.twitter.com/XabhEtWl3V
🏟️ Coldplay in Ahmedabad! #ColdplayAhmedabad 🇮🇳 pic.twitter.com/mberKMN0iG— Coldplay Access (@coldplayaccess) January 25, 2025
'कोल्डप्ले'चा कॉन्सर्ट आता ओटीटीवर लाइव्ह
'कोल्डप्ले' बँडचा लाइव्ह परफॉर्मन्स निमित्त प्रथमच एक खास प्रयोग करण्यात आलाय. 'कोल्डप्ले'चा लाइव्ह परफॉर्मन्स Disney+ Hotstar वर लाइव्ह स्ट्रीम करण्यात आलाय. संध्याकाळी ७.४५ वाजता हा परफॉर्मन्स घरबसल्या प्रेक्षकांना लाइव्ह पाहायला मिळाला. 'कोल्डप्ले'चे आतापर्यंत झालेले तीन-चार शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या सर्व शोला प्रेक्षकांनी हाउसफुल्ल गर्दी केलीय.