ब्रॅड पिट तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार; गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, कोण आहे ती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:04 IST2025-04-25T18:00:35+5:302025-04-25T18:04:07+5:30

ब्रॅड पिट दोन घटस्फोटानंतर आता तिसऱ्यांदा एक नवीन इनिंग सुरू करणार आहे.

Brad Pitt reportedly proposed two Ines de Ramon Going To Marry At Age Of 61 after divorcing jennifer aniston and Angelina Jolie | ब्रॅड पिट तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार; गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, कोण आहे ती? जाणून घ्या...

ब्रॅड पिट तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार; गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, कोण आहे ती? जाणून घ्या...

Brad Pit: जगभरातील दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट होणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत ब्रॅड पिट (Brad Pitt) सध्या चर्चेत आला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर ॲनिस्टन (Jennifer Aniston) आणि अँजेलिना जोली (Angelina Jolie) यांच्यासोबत संसार थाटून काडीमोड घेतल्यानंतर आता तो तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. दोन घटस्फोटानंतर ब्रॅड पिट तिसऱ्यांदा एक नवीन इनिंग सुरू करणार आहे. अभिनेत्यानं गर्लफ्रेंड इनेस डी रॅमनला प्रपोज केलं आहे.

ब्रॅड पिटची गर्लफ्रेंड इनेस डी रॅमन ही एक ज्वेलरी डिझायनर आहे. दोघेही २०२२ पासून एकमेकांना डेट करत आहेत. 'रडार ऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, ब्रॅड पिटनं  इनेस डी रॅमन हिला सहा आठवड्यांच्या शूटिंगसाठी न्यूझीलंडला जाण्यापूर्वी प्रपोज केलं होतं.  इनेस डी रॅमन ही ३२ वर्षांची असून ब्रॅड पिट ६१ वर्षांचा आहे.  इनेस डी रॅमनदेखील घटस्फोटीत आहे. ती २०२२ मध्ये 'द व्हॅम्पायर डायरीज' फेम पॉल वेस्लीपासून वेगळं झाली होती.

दरम्यान, ब्रॅड पिट पहिलं लग्न २००० मध्ये अभिनेत्री जेनिफर शी केलं. पण, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. २००५ मध्ये  'मिस्टर अँड मिसेस स्मिथ' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता अँजेलिना जोलीच्या जवळ आला. त्यानंतर ब्रॅड पिटनं जेनिफरसोबत मतभेदाचं कारण देत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि त्यांचं नातं ऑक्टोबर २००५ मध्ये संपुष्टात आलं. यानंतर ब्रॅडने अँजेलिना जोलीशी २०१४ मध्ये लग्न केलं. त्यांचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. २०१६ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मात्र त्यांच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेला ८ वर्षे लागली होती. 
 

Web Title: Brad Pitt reportedly proposed two Ines de Ramon Going To Marry At Age Of 61 after divorcing jennifer aniston and Angelina Jolie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.