कोण आहे गायक फ्लिपरॅची? 'धुरंधर' मधील गाण्याला बनवलंय ग्लोबल ट्रेंड, वाचा माहित नसलेली गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 10:51 IST2025-12-12T10:49:18+5:302025-12-12T10:51:50+5:30
Who is Flipperachi: मागील काही महिन्यांपासून रणवीर सिंगच्या धुरंधर या बहुप्रतीक्षित सिनेमाची चर्चा होती.

कोण आहे गायक फ्लिपरॅची? 'धुरंधर' मधील गाण्याला बनवलंय ग्लोबल ट्रेंड, वाचा माहित नसलेली गोष्ट
Dhurandhar Singer Flipperachi : मागील काही महिन्यांपासून रणवीर सिंगच्या 'धुरंधर' या बहुप्रतीक्षित सिनेमाची चर्चा होती. रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश धुमाकुळ घातला आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट सिनेरसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. या सिनेमात रणवीर सिंगने मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र, अक्षय खन्नाने साकारलेल्या रेहमान डकैतची सर्वत्र चर्चा होत आहे.चित्रपटातील अक्षय खन्नाचा डान्स, अभिनयाला सगळीकडे वाहवाह मिळते आहे.
दरम्यान, दमदार कथा, उत्कृष्ट संवाद आणि कलाकारांच्या अप्रतिम अभिनयासह
या चित्रपटातील एक गाणं प्रेक्षकांच्या ओठांवर आलं आहे. सध्या सोशल मीडियावरही हे गाणं टेंड्रिंग असून या गाण्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. एकीकडे सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच अक्षय खन्नाच्या डान्सनं आणि या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.'Fa9la' हे गाणं 'धुरंधर' सिनेमामुळे चांगलंच व्हायरल झालंय.शिवाय हे गाणे सध्या इंस्टाग्राम रील्स, यूट्यूबवर ट्रेंड करत आहे.अक्षय खन्नाला या गाण्यात बेधुंदपणे नाचताना पाहून सर्वजण आनंदी झाले आहेत.हे गाणं युट्यूब आणि इतर म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
कोण आहे Fa9la गाण्याचा गायक? (Who is Flipperachi)
'धुरंधर' सिनेमातील Fa9la हे गाणं सध्या चांगलंच गाजतंय. बहरीनचा प्रसिद्ध गायक
फ्लिपरॅचीने हे गाणं गायलं आहे.त्याचं खरं नाव हुसैम असीम आहे. हिप हॉप संगीत क्षेत्रात तो प्रचंड लोकप्रिय आहे. मिडिया रिपोर्टनुसार,फ्लिपरॅचीने वयाच्या १२ व्या वर्षापासून गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. २००३ मध्ये त्याने संगीत क्षेत्रात प्रवेश केला. यानंतर काही वर्ष त्याने सोलो परफॉर्म केले. २००८ च्या सुमारास तो 'आउटलॉ प्रॉडक्शन्स'चा भाग झाला. याच काळात त्याने आपला पहिला अल्बम, 'स्ट्रेट आउट्टा २ सीज' लॉन्च केला.
फ्लिपरॅची खलिजी-शैलीतील रॅप संगीत तयार करतो. खलिजी म्हणजे अरबी आखाती प्रदेशातील हिप-हॉप गाणी आणि आधुनिक बीट्स यांचे मिश्रण.ही गाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली जातात, ज्यात तबला आणि इतर वाद्यांचा समावेश असतो.
जाणून घ्या 'या' गाण्याचा अर्थ...
दरम्यान, एका वेबसाईटने 'Fa9la' गाण्याचे शब्द आणि त्याचा अर्थ सांगितला आहे. 'Fa9la' गाण्याचे मुळ शब्द-याखी दूस दूस इंदी खोश फासला, याखी तफूज तफूज वल्लाह खोश रकसा, इंदी लक रकसा कविया या अल-हबीब, इस्महा सबूहा खतभा नसीब मिद यदक जिन्क ब्तातिहा कफ, वा हेज जितफिक ईल खल्लिक शदीद....
या गाण्याचा अर्थ पुढीलप्रमाणे:- मित्रा, जोरात नाच, आज मी भरपूर मस्ती करायच्या मूडमध्ये आहे... मित्रा, सर्व सोड, तुला देवाची शपथ, चल एक मस्त डान्स करु... मित्रा, तुझ्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त डान्स स्टेप आहे... त्याचं नाव सबूहा आहे, नशीबाने हे तुझ्यासाठीच लिहिलं आहे... तुझा हात वर कर आणि ताल धर... तुझ्या खांद्यांना जोरात हलव आणि तुझ्यातली एनर्जी अशीच राहूदे.