‘मोहर’मध्ये अनुभवा ‘आयटम नंबर’

By Admin | Updated: November 23, 2015 01:36 IST2015-11-23T01:36:29+5:302015-11-23T01:36:29+5:30

सध्या बॉलिवूडचा फंडा मराठीमध्ये आजमवण्याचा प्रयत्न निर्माता-दिग्दर्शकांकडून होत आहे.. आता हेच पहा ना! केदार शिंदे यांच्या ‘अग बाई अरेच्चा’ मध्ये सोनाली

Experience 'item number' in 'Mohar' | ‘मोहर’मध्ये अनुभवा ‘आयटम नंबर’

‘मोहर’मध्ये अनुभवा ‘आयटम नंबर’

सध्या बॉलिवूडचा फंडा मराठीमध्ये आजमवण्याचा प्रयत्न निर्माता-दिग्दर्शकांकडून होत आहे.. आता हेच पहा ना! केदार शिंदे यांच्या ‘अग बाई अरेच्चा’ मध्ये सोनाली बेंद्रेचे आयटम साँग बॉक्स आॅफिसवर हिट ठरल्यानंतर अनेकांनी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकीत उडत्या चालीची गीतं मराठीमध्ये आणण्याचा टे्रंड आणला आहे... चित्रपट यशस्वी होवो अथवा न होवो... पण अशा गाण्यांवर पावले तर नक्कीच थिरकतात... अशी काहीशी धारणा झाल्यामुळे हिंदी चित्रपट स्टाईल मराठीत देखील आयटम साँगची संख्या हळूहळू वाढू लागली आहे...
आगामी विजय पाटकर दिग्दर्शित ‘मोहर’ चित्रपटात असेच एक आयटम साँग पहायला मिळणार असून, सोशल नेटवर्किंग साईट्सवर हे गाणं धुमाकूळ घालणार हे निश्चित! या चित्रपटाची कथा रेखा जगताप यांनी लिहिली असून, पटकथा-संवाद-गीते दीपक भागवत यांचे आहे. सयाजी शिंदे, प्रसाद ओक, आदिती सारंगधर, विजय कदम, हेमलता बाने, प्रितम पाटील आणि पांडुरंग फडतरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Experience 'item number' in 'Mohar'